आयुष प्रसाद म्हणाले, बायोगॅस फ्री फॅब्रिकेटेड असल्यामुळे हे सयंत्र एका दिवसात उभारता येते. बांधकामास लागत असलेला खर्च व त्रास वाचतो. अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची मान्यता आहे. बॉयोगॅसमुळे बरेच फायदे होतात.
दरम्यान, आयुष प्रसाद यांनी सुरेखा ढवळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून भरविलेले प्रदर्शन, भिवरी शाळा, तलाठी सजा यांस भेट देऊन उत्कृष्ट कामकाजाबद्दल अभिनंदन केले. तदनंतर भिवरी दशक्रिया घाटावर वृक्षारोपण केले.
यावेळी अविनाश केसकर म्हणाले बाॅयोगॅस सयंत्र एचडीपीईमध्ये तयार केले असलेने गंजणे, गळती याची भीती नाही. प्रतिदिन ४०० ग्रॅम एलपीजीची बचत करते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय कटके यांनी केले. सूत्रसंचलन माऊली घारे यांनी केले. आभार गणपत खोत यांनी मानले.
२३ गराडे
बाॅयोगॅस प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी उपस्थित असलेले आयुष प्रसाद, नलिनी लोळे, दत्तात्रय काळे, अमर माने, संजय कटके व इतर.