पुणो : लवळे येथील राष्ट्रपतींच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचा:यांना पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर मुंढे यांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. त्याची तक्रार पोलीस अधिक्षक मनोज लोहिया
यांच्याकडे केल्यावर त्यांनी मुंढे यांची चांगलीच कानउघडणी केल्याची माहिती सुत्रंनी दिली.
सिम्बायोसिस महाविद्यालयाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बुधवारी लवळे येथे येणार आहेत. त्यासाठी साधारणपणो दीड हजार पोलिसांचा फौजफाटा लावण्यात आलेला आहे. रविवारपासूनच पुणो शहर, जिल्हा आणि अन्य जिल्ह्यांमधील पोलीस ठाण्यांमधून पोलीस कर्मचारी याठिकाणी आलेले आहेत. त्यांचा नियमीत सराव
सुरु आहे.
सोमवारी संध्याकाळी अधिक्षक लोहिया कर्मचा:यांना सुरक्षाविषयक सुचना सांगत होते. त्यावेळी समोर बसलेल्या कर्मचा:यांच्या पाठीमागील बाजुस असलेल्या मांडवाजवळ 2क्क् पोलीस कर्मचारी बसलेले होते. पोलीस निरीक्षक मुंढे यांनी त्याठिकाणी जाऊन ‘ऊठा ऊठा पुढे बसा’असे म्हणत सर्वाना उठवायला सुरुवात केली. त्यांनी सांगितल्यावर हे कर्मचारी पुढे चालत जात असतानाच मुंढे यांनी पाठीमागून ढकलायला सुरुवात केली.
जोरजोरात ढकलत असतानाच त्यांनी अनेक कर्मचा:यांना लाथा घालायला सुरुवात केली. त्यामुळे वैतागलेल्या कर्मचा:यांनी मुंढे यांना समजावत पुढे गर्दी असल्यामुळे हळू हळू जात असल्याचे सांगितले. परंतु मुंढे यांनी काहीही न ऐकता या कर्मचा-यांना ‘माकडा’ असे म्हणत पुन्हा लाथा घालायला सुरुवात केली. ‘आम्ही पोलीस आहोत, जनावरे नाहीत’ असे म्हणत हे कर्मचारी रांगेत जाऊन बसले. मुंढेंच्या या अरेरावीचा जाब विचारणा:या एका कर्मचा:याचा त्यांनी मोबाईलमध्ये फोटो काढून घेतला. तेव्हा या कर्मचा:याने ‘मी वॉंटेड आहे की गुन्हेगार, माझा कशाला फोटो काढता’ असे विचारल्यावर मुंढे यांनी त्याला बघून घेतो अशी धमकीही दिली.
लोहिया यांना कर्मचा:याने हा प्रकार सांगितल्यावर अन्य कर्मचा-यांनीही मुंढेंची तक्रार केली. कर्मचा-यांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती लोहियांना केली. त्यानंतर लोहियांनी मुंढे यांना बाजुला घेऊन त्यांची चांगलीच कानउघडणी केली. अधिक्षकांनीच मुंढे यांना धारेवर धरल्यावर मात्र पुन्हा ते कर्मचा-यांकडे फिरकले नाहीत. (प्रतिनिधी)
पोलीस निरीक्षक शंकर मुंढे यांनी लाथा मारल्याची तसेच शिवीगाळ केल्याची तक्रार कर्मचा-यांनी तोंडी केली होती. परंतु अद्याप लेखी स्वरुपात तक्रार प्राप्त झालेली नाही. कर्मचा-यांनी लेखी तक्रार केल्यानंतर घटनेची चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल.
- मनोज लोहिया
(अधिक्षक, ग्रामीण पोलीस)
4पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गेल्या काही दिवसात गुन्हेगारी वाढत चालली आहे. कुख्यात गजा मारणो आणि त्याच्या टोळीने निलेश घायवळ टोळीच्या पप्पू गावडेचा दोन आठड्यांपुर्वीच
खून केला होता. गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर जरब बसवण्यामध्ये अपयशी ठरलेले पोलीस निरीक्षक मुंढे पोलीस कर्मचा-यांवर जरब बसवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज डिलीट केली जाण्याची भिती या कर्मचा-यांनी व्यक्त केली आहे.