शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
“विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
4
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
6
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
7
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
9
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
10
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
11
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
12
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
13
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
14
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
15
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
16
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
18
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
19
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

वाहतूक शाखेच्या निरीक्षकानं इंटेरिअर डेकोरेटरच्या कानाला लावलं पिस्तूल;पुण्यातील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 8:25 PM

समर्थ वाहतूक शाखेतील धक्कादायक प्रकार : केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पुणे : घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम व्यवस्थित झाले नाही, म्हणत वाहतूक शाखेच्या एका पोलीस निरीक्षकाने इंटेरियर डेकोरेटरच्या कानाखाली पिस्तुल लावून दिलेले पैसे परत मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकाराने संपूर्ण पुणे पालीस दलात खळबळ उडाली आहे.राजेश पुराणिक असे वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुराणिक हे समर्थ वाहतूक विभागात निरीक्षक आहेत.

याप्रकरणी कार्तिक रामनिवास ओझा यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी राजेश पुराणिक यांनी कानाखाली पिस्तुल लावून मारहाण केली. तसेच कुटुंबियांचाही मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे.

पुराणिक हे राहत असलेल्या नाना पेठेतील घराचे इंटेरिअर डेकोरेशनचे काम करण्यास ओझा यांना दिले होते. घराचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर पुराणिक यांच्याकडे ओझा यांनी कामगारांचे पैसे देण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावेळी पुराणिक यांनी कामामध्ये किरकोळ चुका काढल्या. तसेच काम व्यवस्थित झाले नसल्याचे म्हणत पैसे देण्यास नकार देत कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली. ते गेल्या ८ दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारे धमक्या देत व पैशांची मागणी करीत आहेत. ते कुटुंबातील सदस्यांना मानसिक त्रास देत आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

पुराणिक यांनी ओझा यांना समर्थ वाहतूक विभागात सर्व कागदपत्रे घेऊन बोलावले. त्या ठिकाणी पैसे दिले नाहीत म्हणून बुटाने व लाथाबुक्क्यांनी बेदाम मारहाण केली. त्यानंतर कानाखाली पिस्तुल लावून दम देत कागदपत्रांवर सही घेतली. जबरदस्तीने मोबाईल घेऊन त्यातील संपर्कातील व्यक्तींना चुकीचे संदेश पाठविले. असे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी कार्तिक ओझा यांच्या बहिणीने पोलीस आयुक्तालयात तक्रार अर्ज दिला होता. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. या तक्रार अर्जावरुन पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोणी पिस्तुलाचा धाक दाखविला असेल तर त्याच्यावर कलम ३०७ नुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दखल केला जातो.

याबाबत पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे यांनी सांगितले की, समर्थ पोलीस ठाण्यात प्राप्त झालेल्या तक्रार अर्जानुसार आता अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जात हत्यार लावल्याचे म्हटले आहे. त्याबाबत चौकशी करुन पुढील कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना कळविण्यात आले आहे.

राजेश पुराणिक हे एक कर्तव्यनिष्ठ व कायद्याबाबत अतिशय कठोर असलेले अधिकारी म्हणून ओळखले जातात. पुराणिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, या प्रकारामुळे त्यांनी मोबाईल कॉल न घेतल्याने संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस