शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरलं! मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2
भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी
3
"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत
4
...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका
5
खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक
6
अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश
7
आता GPay युझर्सना मिळणार Gold Loan; 'या' कंपनीसह झाला करार, पाहा डिटेल्स
8
"असं केलं, तर महाराष्ट्रात आरक्षणाचा वाद राहणार नाही", शरद पवारांनी काय सुचवला मार्ग?
9
शेअर बाजार उघडताच पुन्हा विक्री सुरू, सेल ऑन राइजमध्ये अडकला बाजार; BPCL, एशियन पेंट्स आपटला
10
MIM ची मविआत एन्ट्री?, काँग्रेस-राष्ट्रवादीला लेखी प्रस्ताव; २ बैठका सकारात्मक
11
मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; शरद पवारांनी केंद्राचे केले अभिनंदन, म्हणाले...
12
'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन
13
करामती Rashid Khan 'ते' वचन विसरला! क्रिकेटरनं ३ भावांसह एकाच मांडवात उरकलं लग्न
14
मोदी सरकारची नवी स्कीम, १ कोटी तरुणांना महिन्याला ₹५००० मिळणार; कधी, केव्हा, कसा कराल अर्ज?
15
मराठी भाषेला अभिजात दर्जा, राज ठाकरेंनी केलं स्वागत; या निर्णयाचा फायदा सांगितला
16
Bigg Boss 18: बॉलिवूड सुंदरी घेणार घरात एन्ट्री, ९० च्या दशकातील ही 'सेन्सेशनल क्वीन' कोण?
17
इस्त्रायलची मोठी कारवाई! बेरुतही स्फोटांनी हादरला, हिजबुल्लाहचा नवा चीफ सफीद्दीन टारगेटवर
18
संपादकीय: इराणने का उडी घेतली? पडसाद अमेरिकेतील निवडणुकीत
19
मोठी बातमी! मंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात, चालक गंभीर, पिकअपला दिली धडक
20
सत्तार दोन तास उशिरा आले, कार्यक्रम सोडून गेले! बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेत गदारोळ

राष्ट्र उभारणीची प्रेरणा संस्कृतीतूनच मिळते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:13 AM

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली ...

पुणे : “भारताची ओळख ही केवळ येथील वंश, भाषा व जाती यांवर आधारित नसून ती एकात्म संस्कृतीतून निर्माण झाली आहे. राष्ट्राच्या उभारणीची प्रेरणा ही त्याच्या संस्कृतीतूनच मिळते. ती परदेशातून आयात करून चालत नाही,” असे मत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित ‘आझादी का अमृतमहोत्सव’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ‘भारतीय एकतेची मूलभूत तत्त्वे’ या विषयावर आरिफ मोहम्मद खान बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मंगेश कुलकर्णी, प्रा. शांतीश्री पंडित, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई आदी या वेळी उपस्थित होते.

आरिफ मोहम्मद खान म्हणाले की, भारतीय संस्कृती सर्व प्राणिमात्रांना समान प्रतिष्ठा देते. या संस्कृतीची मुळे वेद व उपनिषदांमध्ये आहेत. नवीन पिढीने हा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत केला पाहिजे. दीर्घकाळ ज्या राष्ट्राला नाकारले गेले, ज्यावर परकीय राज्य करत होते, त्या राष्ट्राच्या उत्थान्नाची प्रेरणा ही परदेशी विचारांनी प्रभावित असू शकत नाही. भारतासाठीसुद्धा हा प्रेरणास्रोत इथल्या संस्कृती आणि परंपरांच्या मुळाशी दडलेला आहे. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, “भारतीय प्रबोधनात आणि शैक्षणिक क्षेत्रात पुण्याचे मौलिक योगदान आहे. महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, नामदार गोखले यांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुण्याला वारसा असून तोच विद्यापीठ पुढे चालवत आहे.”

चौकट

“जगातील इतर देशांप्रमाणे भाषा, राहणीमान, उपासना पद्धत, प्रांत किंवा वर्णाच्या आधारे भारतीय सभ्यतेच्या बाबतीत मापदंड लावता येणार नाही. कारण, भारतात वेगवेगळ्या उपासना पद्धती, भाषा, राहणीमान, वर्ण सर्वच काही आहे. एका मापदंडात इथली सभ्यतेची परिभाषा करता येणार नाही.”

-आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ