उंडवडी कडेपठार : गेल्या एक महिन्यापासून उंडवडी कडेपठार येथील गावठाण ए. जी. रोहित्र शेतीपंपाची थ्री फेज लाईन एक महिन्यापासून बंद होती. याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरणने तातडीने येथील वीज यंत्रणेची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला.
शेतीमधील मका, कडबा, भुईमूग तसेच इतर पिके शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणी असूनदेखील काही पिके जळण्याच्या मार्गावर आहेत, तर काही पिके पूर्णपणे जळून गेली आहे. यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडले. एक महिन्यापासून महावितरणाने याकडे दुर्लक्ष केले होते. या विषयाची लोकमतने शनिवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत महावितरणाने ताबडतोब दखल घेत जळालेले रोहित्र बदलून नवीन रोहित्र बसवले आहे.
फोटो ओळ : उंडवडी कडेपठार येथे नवीन रोहित्र बसवताना महावितरणचे कर्मचारी.
३००५२०२१-बारामती-०३
३००५२०२१-बारामती-०४
------------------------