शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
2
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
3
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
4
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
5
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
6
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
7
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
8
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
9
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
10
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
11
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
12
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
13
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?
14
Irani Cup 2024 : अजिंक्य की ऋतुराज? MUM vs ROI मॅच ड्रॉ झाली तर कोण उचलेल ट्रॉफी?
15
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
16
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
17
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
18
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
19
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
20
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना

स्मार्ट सिटीसाठी संस्था, संघटनांचा पुढाकार

By admin | Published: September 21, 2015 4:14 AM

केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शहराचा समावेश व्हावा, याकरिता पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या

पुणे : केंद्र शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये पुणे शहराचा समावेश व्हावा, याकरिता पुणे महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट सिटी अभियानाला सर्वोतोपरी मदत करण्यासाठी शहरातील विविध व्यावसायिकांच्या संघटना, स्वयंसेवी संस्था पुढाकार घेणार आहे. शनिवारी आयुक्त कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिनिधींना स्मार्ट सिटी अभियानाची सविस्तर माहिती देण्यात आली.स्मार्ट सिटी योजनेमध्ये कशाला प्राधान्य देण्यात यावे, त्यामध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश असावा, याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य शहरातील नागरिकांची मते जाणून घेतली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील विविध व्यावसायिकांच्या संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी आयुक्त कार्यालयामध्ये घेण्यात आली. या वेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, राजेंद्र जगताप, उपायुक्त अनिल पवार, मंगेश दिघे उपस्थित होते.स्मार्ट सिटी अभियान काय आहे, त्याअंतर्गत शहराचा काय विकास होणार आहे, त्याचे विविध टप्पे कसे आहेत, याचे अनिल पवार यांनी सविस्तर सादरीकरण केले. विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्न, शंकाचे या वेळी समाधान करण्यात आले. पालिकेचे कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी घरोघर जाऊन नागरिकांच्या स्मार्ट सिटीकडूनच्या अपेक्षा जाणून घेत आहेत. नागरिकांकडून एक छोटी प्रश्नावली असलेला अर्ज भरून घेतला जात आहे. (प्रतिनिधी)