शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विमामाफियांचे पीक फोफावले, शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विम्यातून लूट

By नितीन चौधरी | Published: February 17, 2023 7:40 AM

शेतकऱ्यांच्या नावाखाली पीक विम्यातून लूट : कृषी विभागाची तपासणी सुरू

नितीन चौधरीपुणे : जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली पीकविम्याचे अनुदान लाटणाऱ्यांचा पर्दाफाश झाल्यानंतर हे लोण राज्यात पुणे, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, सांगली, जालना, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतही पसरल्याचे उघड झाले आहे. मूळ शेतकऱ्याला अंधारात ठेवून कोट्यवधींचे पीकविमा अनुदान लाटल्याचे कृषी विभागाच्या प्रत्यक्ष पाहणीत स्पष्ट झाले आहे.

यंदा अडीच लाख शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. त्यातील केवळ ३० हजार विमाधारक शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी झाली असून, त्यात सव्वादोन हजार बनावट शेतकऱ्यांनी पीकविमा लाटला आहे. गेल्या दोन वर्षांपासून असे प्रकार सुरू असून, राज्यात विमामाफियांचे पीक फोफावल्याचे सिद्ध होत आहे. राज्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे २ लाख ४८ हजार ३६२ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या समवेत आतापर्यंत ३० हजार ९८२ शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पीक पाहणी केली आहे. 

कोणीही काढू शकतोसंकेतस्थळावरून  पीक विमा कोणीही काढू शकतो. हे माफिया विमा उतरविण्याच्या शेवटच्या दिवशी विमा न काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावाने विमा काढतात. हमखास अनुदान प्राप्त होत असल्याने कुठल्या पिकाचा विमा काढायचा हे माफिया ठरवतात. 

७० नव्हे केवळ ३पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका गावात सुमारे ७० शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा काढल्याचे संकेतस्थळावर दिसत आहे. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत केवळ तीन शेतकऱ्यांच्याच शेतात डाळिंब पीक आढळले. 

पंधरा लाख लाटलेnसांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या नावावर लिंबू पीकविमा काढण्यात आला. प्रत्यक्ष पाहणीत तेथे सोयाबीन पीक होते. तपासाअंती विमा काढणारा शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील असल्याचे सिद्ध झाले. nयात त्याला विम्याच्या अनुदानापोटी १ लाख २० हजार रुपये मिळाले होते. त्याची पूर्ण चौकशी केल्यानंतर त्याच्या अख्ख्या कुटुंबानेच पीकविमा काढल्याचे आढळले. त्यातून त्याने गेल्या वर्षी १५ लाख रुपये कमविले होते. प्रत्यक्षात तो शेतकरीही नव्हता. nविमा कंपनीने त्याच्याकडून १ लाख २० हजार वसूल केले; पण त्यापूर्वीचे १५ लाख वसूल करता आले नाहीत.

जिल्हानिहाय तपासणी

जिल्हा     तपासणी     योग्य     अयोग्यनगर     २९७     २८५     ७धुळे     २३८     २२०     १८ नागपूर    ३४    २८     ६नाशिक     १०१     ९९     २सोलापूर     २०२     १६६     ३२ रत्नागिरी     २३७     २२१     ४सिंधुदुर्ग     ३६७     ३६१     ६औरंगाबाद     ७८६     ६९४     ९२ जालना    ५९२७     ४८८२     १०४५ कोल्हापूर     २७९     २३६     ४३ लातूर     ४२३     ४१५     ८सांगली     १४९७     १०८१     ४१६ बीड     ८५०     ८४५     ५जळगाव     ८७७८     ८४७७     ३०१ नांदेड     ८३६     ७८५     ५१ उस्मानाबाद     ६२४     ५८९     १६ पुणे     ४३९     २१७     २२२

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी