श्रीकिशन काळे- पुणे : कोरोना विषाणू हा श्वसनावर हल्ला करतो आणि त्यामुळे रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवावे लागते. इटलीमध्ये पुरेसे व्हेंटिलेटर नसल्याने हजारो रूग्णांचे प्राण गेले. भारतातदेखील व्हेंटिलेटर्स अपुरे आहेत. त्यामुळे महामारीच्या काळात देशासाठी स्वस्तात व्हेंटिलेटर बनविण्याचा ध्यास काही इंजिनिअरने घेतला. कमी पैशांत कमी जागेत मावणारा ‘श्वास’ व्हेंटिलेटर तयार करण्यात त्यांना यश आले. व्हेंटिलेटरमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला असून, लवकरच तो सरकारकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
औंध येथील ग्रिफिन रोबोटिक संस्थेतील इंजिनिअर एकत्र आले आणि त्यांनी हा व्हेंटिलेटर बनविला. त्यासाठी ग्रिफिन संस्थेचे संचालक अमेय कांदळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. अंबू बॅगचा वापर यात केला आहे. क्लाऊडवर माहिती साठविण्याची क्षमता आहे. रूग्णाची सर्व माहिती त्वरित कुठेही पाहता येते. डॅशबोर्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीचा वापर करून तयार केला आहे. त्यामुळे हा अतिशय सुटसुटीत असा व्हेंटिलेटर सरकारच्या कामी येणार आहे. कांदळकर म्हणाले, ‘‘या व्हेंटिलेटरमध्ये इलेक्ट्रिॉनिक वस्तूंचा वापर केला आहे. एमआयटीने एक व्हेंटिलेटर तयार केले असून, त्यांनी बनवले तर आपणही प्रयत्न करावा म्हणून आम्ही ‘श्वास’ बनवला आहे. हा बनविण्यासाठी साधारण दोन आठवडे लागले. आता सरकारच्या ‘कवच’ या योजनेतंर्गत त्यांना आम्ही हा व्हेंटिलेटर वापरावा असा प्रस्ताव दिला आहे. सर्वसाधारणपणे सात ते आठ लाख रुपये एका व्हेंटिलेटरची किंमत असते. परंतु, हा अतिशय कमी पैशांत तयार होत आहे. त्यामुळे सरकारला याचा फायदा होईल. तसेच ग्रामीण भागात अधिक उपयोगात आणता येणार आहे.’’
.......श्वास’ व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्येकॉम्पॅक्ट आणि कमी पैशांत तयारलहान आकार असल्याने कुठेही पटकन नेता येतोवापरण्यासाठी अतिशय सोपा आणि सुटसुटीतक्लाऊड कनेक्टिव्हिटी असल्याने सर्व माहिती कुठेही पाहता येतेग्रामीण भागात अधिक उपयोगीमॉंनिटर करायला ही अतिशय सोपा आहे........