पुणे: लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन विरोधकांवर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चिट देण्यात आल्यानंतर कन्नड कारखानाला जप्तीची नोटीस दिली आहे. पक्षफुटीनंतर माझ्याविरोधातील कारवाईला जोर आला आहे. मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. तरूंगात टाकले तरी माझी लढाई सुरू राहील. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पक्षाची व लोकांची बाजू मांडल्याने त्यासोबतचाच सरकारविरोधात मी लढत असल्याने ईडीने मला नोटीस पाठवली आहे, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य सरकारवर निशाणा साधला.
आमदार रोहित पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते विकास लंवाडे आदी उपस्थित होते. रोहित पवार म्हणाले, सोमवारी सकाळी होणाऱ्या चौकशीला हजर राहणार आहे. जप्तीची प्रक्रिया ही १८० दिवसाची असते. ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. बारामती ऍग्रो कंपनीत आठ हजार कर्मचारी काम करीत आहेत. त्यावर अवलंबुन ५० हजार जणांचे कुटुंब आहेत. त्यासोबतच प्रक्रिया उद्योगाशी संबंधित सुमारे तीन लाख लोक आहे. जरांडेश्वर कारखान्याला दिलेली नोटीसच बारामती ऍग्रोला कॉपी करून पाठवली आहे. बारामती अॅग्रो लिमिटेडवर ईडीने कारवाई केली आहे. कन्नड कारखाना जप्तीची नोटीस अजून मला आलेली नाही. कामगारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. आम्हाला आलेल्या नोटिशी विरोधात कोर्टात जाणार आहे. बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये काळा पैसा नाही. सर्व माहिती ईडीला दिली आहे.
ईडीचा बारामती अॅग्रो लिमिटेड विरुद्ध सुरू असलेला तपास बेकायदेशीर आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे विभागाने दोनदा तपास करून सप्टेंबर 2020 आणि जानेवारी 2024 मध्ये फौजदारकी न्यायालयात 'सी समरी' म्हणजेच क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ज्यात या प्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा निष्कर्ष काढलेला आहे. तरीही ईडीने बेकायदेशीर प्रोव्हिजनल जप्ती केली आहे. देषाचे राजकारण सुरू आहे. माझ्यामुळे कुटूंबाला त्रास होत आहे. त्याबददल मी कुटूंबाची माफी मागतो असेही रोहित पवार यांनी सांगितले.
स्वाभिमान गहाण ठेवुन अनेकजण भाजपसाेबत
मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. तरूंगात टाकले तरी माझी लढाई सुरू राहील. स्वाभिमान गहाण ठेवुन अनेकजण भाजपसाेबत गेले आहेत अशा शब्दांत रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टिका केली.
भ्रष्टाचाराच्या ८ ते ९ फाईल आल्या आहेत
माझया कार्यालयात भ्रष्टाचाराच्या ८ ते ९ निनावी फाईल् आल्या आहेत. त्यामुळे या सरकारमध्ये सर्वकाही अलबेल नाही असेही रोहित पवार यांनी सांगितले.