दिघी : शहरातील अनेक इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खासगी संस्थांकडून सहली आयोजित करण्याच्या व स्नेहसंमेलनाच्या नावाखाली पालकांकडे अवाजवी शुल्क भरण्याची सक्ती केली. पालिकेच्या शाळा सोडल्यास खासगी शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी वर्गणीच्या नावाखाली मोठ्या रकमेची मागणी पालकांकडे केली जाते. शहरातील शाळेकडून सहली व स्नेहसंमेलनाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. पुणे दर्शनासाठी लहान मुलांना ६०० रुपये, तर पुण्याबाहेर जाणाऱ्या सहलीकरिता 1600 ते 2000 रुपयांची सक्ती केली जात आहे. सहलीला न जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून स्नेहसंमेलनाच्या आयोजनाकरिता प्रत्येक विद्यार्थी २०० ते ५०० रुपये अशी वाढती रक्कम पालकांना भरण्याची ठरावीक मुदत देण्यात येत आहे. स्नेहसंमेलनाची फी वेळेत न भरल्यास आयोजित स्पर्धेतून विद्यार्थ्यांना काढून टाकण्याचे व कलेपासून वंचित ठेवण्याचे आदेश शहरातील अनेक शाळा व्यवस्थापनाने काढल्याचे पालकांकडून समजते. नोटाबंदीत रांगेत दिवसभर उभे राहून सुद्धा पैसे मिळत नसल्याने कमालीचे संतप्त झाले आहेत. (वार्ताहर)
खासगी शाळांकडून मनमानी शुल्क
By admin | Published: December 24, 2016 12:32 AM