लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुकुंद जोशी आणि डॉ. अमित पाटणकर यांच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज टेनिस अकादमी व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए)तर्फे आयोजित तिसऱ्या कुडो इंडिया सांघिक आंतरक्लब टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत पुण्यातील २६ संघ सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा फर्ग्युसन कॉलेजच्या टेनिस कोर्टवर शनिवारपासून (दि. २७) खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत २६० पेक्षा जास्त खेळाडू खेळणार आहेत.
विजेत्या संघाला २० हजार रुपये व करंडक, तर उपविजेत्या संघाला १० हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेत गतविजेता डेक्कन चार्जर्स, एमडब्लूटीए, पीसीएलटीए हे मानांकित संघ सहभागी होणार आहेत. याशिवाय अर्ली बड्स, सोलारिस आरपीटीए, डेक्कन वॉरियर्स, ऋतुपर्ण डायनामाईट्स, ओडीएमटी अ, ओडीएमटी क, एफसी अ व ब, ऍक्सेस, सोलारिस गोगेटर्स, एसपी ३, एफसी क, टेनिसनट्स आरएएफए, लॉ चार्जर्स, सोलारिस डायनामोज, डेक्कन अव्हेंजर्स, एसपी १, टेनिसनट्स रॉजर, टेनिस टायगर्स, मॉँटव्हर्ट,महाराष्ट्र मंडळ, ओडीएमटी ब आणि एसपी २ हे संघ झुंजणार आहेत
ही स्पर्धा साखळी व बाद फेरीत होणार आहे. दुहेरीचे दोन सामने खुल्या गटात होतील. दोन सामने ९० अधिक व १०० अधिक या गटात होणार आहेत. शहरातील हौशी टेनिस खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी म्हणून या गटाचे सामने होणार आहेत.