पुणे : पुणे, गुजरात आणि नेपाळमध्ये सराफी पेढ्या लुटणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्य टोळीतील दोघांना पोलिसांनी अटक केली. कोरेगाव पार्क आणि हडपसर येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून त्यांनी तब्बल १ कोटी ८२ लाखांची रक्कम लुटून नेली होती. यातील दोघे आरोपी शहरात विविध ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते.अजय चंद्रकांत त्रिपाठी (वय ३४, रा. मारुती शोरूमजवळ, वडकी, मूळ, रा. बिरमउ, तहसिल पट्टी, जि. प्रतापगड), गौरीशंकर दिनेशकुमार त्रिपाठी (वय ३०, रा. साईनाथनगर, वडगावशेरी, मूळ रा. उचौली पोस्ट अमतामउ, जि. सीतापूर, उत्तर प्रदेश) यांना पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील आरोपी अविनाशचंद्र श्रीकृष्ण त्रिपाठी (रा. खटौली, रामसनई घाट, जि. बाराबंकी, उत्तर प्रदेश) हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी असे विविध १७ गुन्हे दाखल आहेत. त्याने खुनाच्या गुन्ह्यात ५ वर्षे शिक्षा भोगली असून, दुसºया गुन्ह्यात ४ वर्षे ६ महिने शिक्षा भोगत असताना पोलीस कोठडीतून पळून गेला होता. त्याचबरोबर रमेशसिंग गुरुदयाळ सिंग (विलेशहापूर कोकण वाल्हे, लखनौ, उत्तर प्रदेश), कमलकिशोर ऊर्फ टिंकू कपाला (रा. लखनौ, उत्तर प्रदेश), श्वेता गुप्ता, रवी गुप्ता (रा. लखनौ) यांना पिस्तुल आणि हत्यारासह पुण्यात बोलावून दरोडे घातल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.कोरेगाव पार्क येथील पीएमजी अँड ज्वेलर्सवर २०१४ मध्ये ३ इसम आणि एका महिलेने दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकाना घुसून पिस्तुलाचा धाक दाखवित १ कोटी ४२ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले होते. तसेच हडपसर येथील सोनीगरा ज्वेलर्स येथेही १ हजार ४५० ग्रॅम किंमतीचे ४० लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लुटले होते. या दरोड्यातील मुख्य आरोपी त्रिपाठी हा उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती लागला. त्याने दिलेल्या माहितीवरून पुण्यातील त्याच्या साथीदारांना अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिली.>आरोपी होते सुरक्षारक्षकाच्या कर्तव्यावरदरोड्याच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अजय त्रिपाठी हा फुरसुंगी येथील एका गोदामात, तर गौरीशंकर त्रिपाठी रिलायन्स कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. उत्तर प्रदेशातील पोलिसांना हवा असलेला गुन्हेगार अविनाशचंद्र त्रिपाठी शिक्रापूर येथी शिक्षक भवनसमोर एका भाड्याच्या घरात राहत होता. सुरक्षारक्षक पुरविणाºया एजन्सीने पूर्व चारित्र्य पडताळणी करूनच सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी, अशा सूचना त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली.>चोरीच्या दागिन्यांवर घेतले कर्जदरोड्यातील सोने चक्क तारण ठेऊन त्यावर आरोपींनी कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे. आारोपी अविनाशचंद्र त्रिपाठी आणि त्याची पत्नी स्वातीसिंग यादव हीच्या नावाने मण्णपूरम गोल्ड येथे १६८.६ ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवले होते. हे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. याशिवाय कोरेगाव येथील १ कोटी ४२ लाख रुपयांच्या दरोड्यापैकी साडेसात लाख रुपयांचे सोने आणि हिºयाचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत.>दरोडेखोरांना अटकही टोळी बंडगार्डन येथील केवडिया ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्यासाठी अविनाशचंद्र त्रिपाठी साथीदारांची जुळवाजुळव करण्यासाठी उत्तर प्रदेशात गेला होता. तेथे पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने दरोड्याचा कट उधळला गेला. आरोपी दरोडा टाकण्यापूर्वी त्या दुकानाची संपूर्ण रेकी करीत.कामगारांच्या जाण्या-येण्याच्या आणि जेवणाच्या वेळा, दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा, अशा बाबी पाहून दरोडा टाकला जात होता. कोरेगाव पार्क आणि हडपसरमधील दरोड्यासाठी आरोपींनी चोरीच्या कारचा वापर केला होता.पुण्यातील दरोड्यानंतर या टोळीने गुजरातमधील वडोदरा येथील कल्याण ज्वेलर्सवर २०१५ साली दरोडा घालून ६० लाखांचे दागिने चोरुन नेले. त्यानंतर नेपाळमधे दोन ठिकाणी दरोडा घालून ५६ लाखांच्या दागिन्यांची लुट केली.शिक्रापूरला बंदुकीतून गोळी झाडत चेन चोरी केल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, पोलीस निरीक्षक सतीश कदम, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, राजकुमार तांबे, सुरेश उगले, राजू केदारी, सिराज शेख, किरण पवार, विशाल भिलारे, मुकुंद पवार यांच्या पथकाने कारवाी करीत आरोपींना जेरबंद केले.
आंतरराज्य टोळी केली जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 1:52 AM