पुणे : निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनातील बदल्यांसंदर्भात पोलिस महासंचालकांना सूचना दिल्या आहेत. ३१ जानेवारीपर्यंत बदल्या करता येतील, असे यात सांगितले आहे. या अनुषंगाने पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव शहर पोलिस दलातील १५ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी (दि. १२) दिले. त्यानुसार शहर पोलिस दलात मोठी खांदेपालट झाली आहे. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांनी त्वरित कार्यभार स्वीकारावा, असे आदेश दिले आहेत.
बदल्या झालेल्या निरीक्षकाचे नाव, सध्याची नेमणूक अन् पदस्थापनेचे ठिकाण : दत्तात्रय विश्वनाथ भापकर- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, कांचन मोहन जाधव-पोलिस निरीक्षक (गुन्हे), येरवडा पोलिस ठाणे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, विश्रांतवाडी पोलिस ठाणे, विजय रघुनाथ पुराणिक-पोलिस निरीक्षक (गुन्हे), भारती विद्यापीठ पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, अनिता रामचंद्र हिवरकर - पोलिस निरीक्षक (गुन्हे), फरासखाना पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अमली पदार्थविरोधी पथक- २), सुनील गजानन थोपटे- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अंमली पदार्थविरोधी पथक-२) - पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष, संदीप नारायण देशमाने- पोलिस निरीक्षक (गुन्हे), सहकारनगर पोलिस ठाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे, क्रांतिकुमार तानाजी पाटील- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक -१)-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (खंडणीविरोधी पथक - १), विनायक दौलतराव गायकवाड- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक-१), दशरथ शिवाजी पाटील- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लष्कर पोलिस ठाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, संतोष उत्तमराव पाटील-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बंड गार्डन पोलिस ठाणे -वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे, बाळकृष्ण सीताराम कदम- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, राजेश रामचंद्र तटकरे-वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अलंकार पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, कोर्ट कंपनी, महेश गुंडाप्पा बाळकोटगी- पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (युनिट ५)- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे, विष्णू नाथा ताम्हाणे- वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (युनिट ५), विजय गणपतराव कुंभार- पोलिस निरीक्षक, विशेष शाखा-पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा (अभियोग कक्ष).