लोणावळा : लोणावळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (लिफ्फी) या चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध अभिनेते व चिल्ड्रन फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश खन्ना यांच्या हस्ते झाले. यावेळी अल्ट्रा मीडिया अॅन्ड एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशीलकुमार अग्रवाल, अभिनेते राजेश पेडणेकर, निर्माता जितेंद्र मिश्रा, अभिनेते कवलजीत सिंग, अभिनेते लेखक व निर्माते विवेक वासवानी, आयोजक माधव तोडी हे मान्यवर उपस्थित होते. "संवाद आणि संपर्क" या सामाजिक संस्थांच्या मुलांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. समारंभानंतर संवाद आणि संपर्क संस्थेच्या मुलांनी चित्रपट पाहण्याचा आनंद घेतला. या चित्रपट महोत्सवात 32 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चित्रपट मोफत दाखवण्यात येणार आहेत. सुरुवातील तिन दिवस असणार्या या महोत्सवाला मिळालेला उत्सपुर्त प्रतिसाद पाहता येत्या 7 सप्टेंबर पर्यत विविध शाळांच्या मुलांना मोफत सिनेमे दाखविण्यात येणार असल्याचे फेस्टिवलचे निमंत्रक व ट्रायोज मॉलचे डायरेक्टर महादेव तोडी यांनी सांगितले.यामध्ये हम साथ साथ है, हम आपके है कौन, आय एम कलाम, अंदाज अपना अपना, जलपरी द डेझर्ट मरमैड, स्वर्ग, छोटा सिपाही, रसेल मॅडनेस, मंकी अप, द गोल, माय लकी एलिफंट या प्रसिध्द चित्रपटांचा समावेश आहे.
लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 3:51 PM