पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुंबईत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पिंपरी, भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखती दिल्या. आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे मुलाखतीसाठी आवर्जून उपस्थित होते. अवघ्या १५ मिनिटांत तिन्ही मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती आटोपण्यात आल्या. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी प्रदेशाध्यक्ष अरुण गुजराथी, विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री आर. आर. पाटील, खासदार विजयसिंह मोहिते पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांनी इच्छुकांची मुलाखत घेतली. या वेळी महापौर मोहिनी लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, पक्षनेत्या मंगला कदम उपस्थित होत्या.‘चिंचवड’साठी नगरसेविका शमीम पठाण, झामाबाई बारणे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर, शिक्षण मंडळ सदस्य चेतन भुजबळ, संभाजी बारणे, गुलामअली भालदार यांनी मुलाखत दिली. भोसरी मतदारसंघासाठी आमदार विलास लांडे, नगरसेवक वसंत लोंढे, प्रांतिक सदस्य पंडित गवळी, आनंदा यादव यांनी, तर ‘पिंपरी’साठी आमदार बनसोडे यांच्यासह क्रीडा समितीचे सभापती जितेंद्र ननावरे, नगरसेवक शेखर ओव्हाळ, सविता साळुंके, अॅड. गोरक्ष लोखंडे, माजी नगरसेवक सूर्यकांत थोरात, सनी ओव्हाळ, किसन नेटके, शहराध्यक्ष अशोक भगत, ज्ञानेश्वर कांबळे, सुरेश लोंढे, सुनील चाबुकस्वार, धनंजय भिसे, मीना खिलारे, उत्तम कांबळे यांनी मुलाखत दिली. (प्रतिनिधी)
पंधराच मिनिटांत उरकल्या मुलाखती
By admin | Published: August 27, 2014 5:21 AM