आरपीएफकडून आरोपीला अटक, प्रवासी वाचले
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दारूच्या नशेत पुणे - दानापूर एक्स्प्रेसच्या समोर गाडी टाकून पसार झालेल्या आरोपीस आरपीएफने शनिवारी ताब्यात घेतले. दुचाकी खाली येऊन देखील रेल्वेने १७ किमीचा कसा प्रवास केला? याबद्दल आता प्रश्न निर्माण होत आहे.
ही घटना ११ जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास कुटबाव स्थानकावर घडली.
पुणे - दानापूर एक्स्प्रेस रात्री ९ वाजून पाच मिनिटांनी पुणे स्थानक सोडले. कुटबाव स्थानकावर गाडी येण्यापूर्वी आरोपी आकाश गुडडावर ( वय ३५ ,रा. कूटबाव, पाटस) याने दारूच्या नशेत गाडी अप ट्रॅकवर टाकली. त्यानंतर तिथून पळ काढला. चालकाच्या लक्षात ही बाब येणे गरजेचे होते.इंजीन खाली दुचाकी आली आणि दुचाकी इंजीनच्या खालच्या भागात अडकून राहिली.कुटबाव ते पाटस असा तब्बल १७ किमीचा प्रवास झाला. तो पर्यंत देखील चालकाच्या लक्षात ही बाब आली नाही. पाटस जवळ आल्यानंतर मात्र ब्रेक पाईपमधून हवा मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्यास सुरुवात झाली. मग काहीतरी गडबड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.अन गाडी थांबली. अशीच जर पुढे गाडी धावत राहिली असती तर पुढे रेल्वेचा अपघात झाला असता.
बॉक्स 1
घातपातीचा गुन्हा दाखल :
आरपीएफने या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपीचे शोधकार्य सुरू केले होते.आरोपीला अखेर शनिवारी आरपीएफने ताब्यात घेतले. त्याच्यावर रेल्वे घातपातीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई गुन्हे विभागाचे निरीक्षक एस. बी. गायकवाड,
रोकडे, साजिद शेख, संतोष गायकवाड आदींनी केली.