पुणे : शादी डॉट कॉम या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून एका 31 वर्षीय तरुणीची 24 लाख रुपयांनी आर्थिक फसवणूक करण्यात आली. सेंट्रल मिनिस्ट्रीत नोकरीला असल्याचे सांगून त्याने ही फसवणूक केली. चतु:शृंगी पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशांत रमेशचंद्र नंदवाणा (रा. किशनगंज राजस्थान) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. 31 वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीची शादी डॉट कॉम या संकेतस्थळावर ओळख झाली होती. अधिकांश शिवप्रकाश अग्निहोत्री असे बनावट नाव आरोपीने धारण केले होते. तसेच आपण सेंट्रल मिनिस्त्री ऑफ हौसिंग अँड अर्बन अफेअर्समध्ये नोकरीला असल्याचे सांगितले होते. आरोपीने फिर्यादी सोबत ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि वेगवेगळी कारणे सांगून तिच्याकडून 24 लाख रुपये घेऊन फसवणूक केली आहे. चतु:शृंगी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.