शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

राहूबेटात अवैध वाळूउपसा

By admin | Published: February 12, 2015 11:46 PM

राहूबेट (दौंड) येथील मुळा-मूठा व भीमा नदीपात्रात यंत्रसामग्रीच्या साह्याने भरदिवसा बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. बेसुमार उपसा सुरू असल्याने त्याचा उपद्रव ग्रामस्थांना होत आहे.

राहू : राहूबेट (दौंड) येथील मुळा-मूठा व भीमा नदीपात्रात यंत्रसामग्रीच्या साह्याने भरदिवसा बेकायदा वाळूचा उपसा सुरू आहे. बेसुमार उपसा सुरू असल्याने त्याचा उपद्रव ग्रामस्थांना होत आहे.या पसिरात कुठलाही वाळूचा लिलाव झालेला नाही, तर या लिलावासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही वाळू ठेकेदार सांगतात, की आम्ही लिलाव घेतलेला आहे. त्यामुळे या ठिकाणाहून जी वाळू काढली जात आहे, ती अधिकृतपणे काढली जात आहे, असे सांगून ग्रामस्थ तसेच शासनाची फसवणूक करीत आहेत. मुळा - मुठा नदीपात्रातील मिरवडी, दहिटणे, देवकरधार, तामखडा, टेंगलबेट, वाळकी, कोरेगाव भिवर, वडगाव बांडे, पाटेठाण, टाकळी, देलवडी यांसह १२ ठिकाणे असून त्यापैकी देलवडी, वाळकी या परिसरात अद्याप लिलाव झालेले नाहीत. तरीदेखील या ठिकाणी बेकायदेशीरपणे वाळूउपसा सुरू आहे. या ठिकाणावरील वाळूउपसा तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून पुढे आली आहे. राहू बेटातील रक्ताळलेली वाळू संपूर्ण महाराष्ट्राला चांगलीच परिचयाची असताना सध्या याच वाळूवरून पुन्हा मतभेद होऊन त्याची पुनरावृत्ती न होण्याची काळजी आता वाळू तस्करांसह महसूल यंत्रणेने घेण्याची गरज असल्याची चर्चा सर्वसामान्य व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)