---
दौंड : मलठण (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ या शाळेच्या कामकाजाची चौकशी करण्यात यावी यासाठी सेवानिवृत्त शिक्षक मोहन शिर्के हे दौंड पंचायत समितीच्या परिसरात उपोषणाला बसलेले आहे.
२०१८ पूर्वीचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांनी संगनमताने शाळेचे जनरल रजिस्टर आणि अन्य शालेय रेकॉर्ड बोगस याच बरोबरीने चुकीचे बनविले आहे. दरम्यान, यासंदर्भात शाळेतील काही शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांची बदली झाली आणि त्यांच्या जागी नवीन मुख्याध्यापक आले. परिणामी नवीन मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीने चौकशी करून कारवाई करण्यात यावी, याबाबत गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह वरिष्ठांना तक्रार करून देखील दखल घेतली नसल्याचे मोहन शिर्के यांनी निवेदनात म्हटले आहे.
बोगस रेकॉर्ड करणारे तत्कालीन मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच यातील दोषींना साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी . असे शेवटी निवेदनात म्हटले आहे. गेली पंधरा दिवसांपासून ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षक मोहन शेळके हे उपोषणाला बसलेले आहेत.
--------
समिती नेमली आहे
उपोषणार्थी सेवानिवृत्त शिक्षक मोहन शिर्के यांच्या तक्रारी अर्जानुसार गटशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांनी चौकशी समिती नेमली आहे. या चौकशी समितीत जो कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
अजिंक्य येळे (गटविकास अधिकारी, दौंड)
--
फोटो क्रमांक - २४दौंड उपोषण शिक्षक
फोटो / दौंड येथे उपोषणाला बसलेले सेवानिवृत्त शिक्षक मोहन शिर्के.