भिगवण : मदनवाडी परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरू पाहणाऱ्या चारीच्या कामाची सहा वेळा चौकशी होऊनही शेतकऱ्यांच्या फारसे काही हाती लागले नव्हते. मात्र, ‘लोकमत’ आणि तक्रारदार संतोष सोनवणे यांच्या पाठपुराव्याची दखल आता थेट वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आली आहे. ३६ चारीच्या अंदाजपत्रकाचीच सखोल चौकशी करून चारीचे काम नवीन अंदाजपत्रकानुसार करावे व प्रकरणाचा निपटारा होईपर्यंत बिलाची रक्कम रोखण्याचे आदेश पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत.
इंदापूर व दौंड तालुक्यातील शेतकरी खडकवासला कालव्याच्या माध्यमातून मिळणाºया पाण्याच्या मागील तीस वर्षांपासून प्रतीक्षेत होते. इंदापूर व बारामती तालुक्यातील शेतकºयांना खडकवासला धरणातील ३६ चारीच्या माध्यमातून देण्याचे नियोजन आहे. अखेर दोन वर्षांपूर्वी ३६ चारीच्या कामास निधी मंजूर करण्यात आला. चारीच्या कामास सुरुवात झाल्यानंतर चारीचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार शेतकºयांनी जुलै २०१६ मध्ये केली होती. त्यानंतर जलसंपदा विभागाच्या सहा समित्यांच्या माध्यमातून चौकशी करत शेतकºयांना केवळ झुंजवण्याचे काम मागील दोन ते अडीच वर्षांपासून झाले. आतापर्यंत सहा वेळा या कामाची चौकशी झाली; परंतु चौकशीचे अहवाल मात्र गुलदस्त्यातच राहिले होते. शेतकºयांच्या तक्रारीची आता थेट वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली आहे. जलसंपदाचे मुख्य अभियंता यांनी चारीच्या प्रकरणाचा निपटरा होईपर्यंत कंत्राटदारास देयक अदा करू नये, वितरिकेच्या कामाची दोन उपविभागीय अभियंत्यांकडून संयुक्त मोजणी करून घ्यावी, उर्वरित कामाचे नव्याने अंदाजपत्रक तयार करावे, असे आदेश दिले आहेत.न्याय मिळण्याच्या आशा झाल्या पल्लवीतचारीच्या निकृष्ट कामाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली गेल्यामुळे हे काम पूर्ण होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आदेशानंतर वस्तुस्थिती समोर येईल व न्याय मिळेल, अशी अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे. तक्रारदार शेतकरी संतोष सोनवणे यांनी या यशाबद्दल ‘लोकमत’चे आभार मानत दोन वर्षांपासून या भागातील शेतकºयांच्या लढ्याला मुख्य अभियंत्यांनी दिलेल्या आदेशानंतर शेतकºयांना निश्चित न्याय मिळेल असे वाटते, अशी भावनाव्यक्त केली.