आंबेठाण : खेड तालुक्यात गाळयुक्त अज्ञात खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बनचे (पेट्रोलियम) साठे असण्याची शक्यता असल्याने अशा जागांची तपासणी करण्यासाठी आॅईल आणि गॅस कॉपोर्रेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून न्याचरल सेस्मिक एपीआय प्रोजेक्ट राबविला जात आहे. त्याअंतर्गत भूगर्भाची तपासणी करून सेस्मिक डाटा संकलित करण्याचे काम खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात सुरु आहे. खेड तालुक्यातील कन्हेरसर, दावडी,निमगाव,खरपुडी बुद्रुक,खरपुडी खुर्द,वाकी बुद्रुक,पिंपरी बुद्रुक,पिंपरी खुर्द, गोनवडी, आंबेठाण, कोरेगाव खुर्द,शेलू, आसखेड खुर्द आणि करंजविहीरे अशा १४ गावांमध्ये ही भूगर्भाची तपासणी करण्यात येत आहे. यासाठी जमिनीत जवळपास ८० फुट खोलीचे आणि चार इंच रुंदीचे छिद्र मारण्यात येत आहे. अल्फा जियो इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर माहिती संकलित करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. नांदेड ते पुणे दरम्यान सध्या ही तपासणी सुरु असून खेड तालुक्यातील विविध गावांमधील भूगर्भातील माहिती संकलित करण्यासाठी १८ मशीन कार्यरत आहे.तालुक्याचे तहसिलदार कार्यालयाच्या वतीने कनेरसर,पिंपळगाव,खेड,चाकण,आणि पाईटच्या मंडल अधिकाऱ्यांना याबाबत सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खेड तालुक्यात पेट्रोलियम साठयांच्या शक्यतेने तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 7:17 PM
खेड तालुक्यातील कन्हेरसर, दावडी,निमगाव,खरपुडी बुद्रुक,खरपुडी खुर्द, आसखेड खुर्द आणि करंजविहीरे अशा १४ गावांमध्ये ही भूगर्भाची तपासणी करण्यात येत आहे.
ठळक मुद्देअल्फा जियो इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून हे सर्वेक्षण खेड तालुक्यातील विविध गावांमधील भूगर्भातील माहिती संकलित करण्यासाठी १८ मशीन कार्यरत