शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

' एसआरए ' मधील रहिवाशांची तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 11:40 AM

घर घेणाऱ्या झोपडीधारकाचे तयार होणार डिजिटल रेकॉर्ड..

ठळक मुद्देडिजिटल रेकॉर्डमुळे अनधिकृतांचे चेहरे समोर येणार घर मिळूनही परत आलेल्यांची पाहणी होणार

नीलेश राऊत -  पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) इमारतीमधींल तसेच संक्रमण शिबिरासाठी वापरण्यात येणाऱ्या इमारतीतील सदनिकांमधील रहिवाशी खरोखर पूरग्रस्त आहेत का?, तसेच याठिकाणी सदनिका मिळविण्यास ते पात्र आहेत की अपात्र याची तपासणी करून, अनधिकृतरीत्या सदनिका बळकविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याकरिता एसआरए प्रशासनाने कंबर कसली आहे़. याकरिता सर्व सदनिकाधारकांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याची प्रक्रिया एसआरएने सुरू केली आहे़. आंबिल ओढ्याला २५ सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे शेकडो झोपड्या बाधित झाल्याने, पुन्हा एकदा झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आला़. पूरबाधितांचे पुनर्वसन करताना काहींनी यात हात धुऊन घेत सदनिकांवर ताबा मिळविल्याचे आढळून आले़. परिणामी, एसआरए प्रशासनाने राजेंद्रनगर येथे अनधिकृतरीत्या प्रवेश करणाऱ्या कुटुंबीयांना बाहेर काढण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही मदत घेतली़ हीच परिस्थिती एसआरएच्या अन्य इमारतीतअथवा संक्रमण शिबिराकरिता वापरण्यात येत असलेल्या इमारतीत आढळून आली आहे़. तसेच अनेक पात्र ठरलेले झोपडपट्टीवासीयही सदनिकाप्राप्तीची ऑर्डर मिळालेली नसतानाही अनधिकृतरीत्या सदनिका ताब्यात घेतल्याचे आढळून आले़ यामुळे या सर्व बाबींची तपासणी होणार असून, ज्या कोणी अनधिकृतरीत्या या घरांमध्ये प्रवेश केला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे एसआरएकडून सांगण्यात आले़. आजपावेतो ज्या झोपडपट्टीधारकांना एसआरएमध्ये घरे मिळाली आहेत. त्यांची सर्व माहिती गोळा करून, प्रत्येक सदनिकाधारकाचे ‘डिजिटल रेकॉर्ड’ तयार केले जाणार आहे़. यापूर्वी हा प्रयोगन झाल्याने अनेक अपप्रवृत्तीचे फावले गेल्याचे आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे़. एसआरएकडून तयार करण्यात येणाऱ्या ‘डिजिटल रेकॉर्ड’मध्ये सदर सदनिकाधारकाची पूर्वी रहिवास असलेली झोपडपट्टी कधीपासून होती, त्याच्या रहिवास किती वर्षे तेथे होता, त्याच्याकुटुंबातील संख्या किती, अधिकृत पुरावे दिले आहेत का, आदी बाबी नोंदविण्यात येणार आहे़. याचबरोबर संबंधिताच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे फोटोही या रेकॉर्डमध्ये राहणार आहे, जेणे करून त्या लाभार्थी कुटुंबातील इतर सदस्याला पुन्हा सदनिका घेता येणार नाही याची खबरदारीही घेतली जाणार आहे़. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने सन २००५ पासून आजपावेतो ८ हजार ३४३ झोपडपट्टीधारकांना घरे देण्यात आली आहेत़. यामध्ये ज्यांना घरे मिळाली आहेत. तेच या सदनिकांमध्येआजमितीला राहत आहेत का?, का त्यांनी ते भाडेतत्त्वावर दिले आहे? याचीही तपासणी केली जाणार आहे़. यामध्ये लाभार्थी सदनिकाधारकाने भाडेकरू ठेवला असल्याचे आढळून आल्यावरत्याच्यावरही कारवाई होणार आहे़. .......

घर मिळूनही परत आलेल्यांची पाहणी होणार : रुबल अगरवालझोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाच्या (एसआरएच्या) इमारतींमध्ये किंवा बीएसयूपीमध्ये ज्यांना घरे मिळाली असतानाही, संबंधित लाभार्थी पुन्हा झोपडपट्टीत राहण्यास आले असल्यास त्याची चौकशी केली जाईल़ अशी माहिती पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी दिली़. आंबिल ओढ्या आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या झोपडपटट्ट्यांमधील नागरिकांच्या पुनर्वसनाच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होत्या़ .........

डिजिटल रेकॉर्डमुळे अनधिकृतांचे चेहरे समोर येणार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या वतीने सन २००५ पासून ८ हजार ३४३ लाभार्थ्यांना घरे दिली गेली आहेत; तसेच नव्यानेही काही योजनांमध्ये घरे देण्याची प्रक्रिया चालू आहे़. ........हे काम करीत असतानाच आता प्राधिकरणाने या सर्वांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याचे ठरविले आहे़. यामुळे अनधिकृतरीत्या घुसलेल्यांवर कारवाई होऊन, खऱ्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल व नियमामध्ये बसणाऱ्या ; तसेच अधिकृत पुराव्याच्या आधारावर पात्र झोपडपट्टीधारकाला न्याय मिळेल़, असे एसआरए प्रमुख राजेंद्र निंबाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़. ........दरम्यान, एसआरए योजनेत ज्या विकसकाला काम दिले गेले होते, त्या विकसकाने पात्र व्यक्तींव्यतिरिक्त दुसऱ्यांनाच घरे दिल्याचे आढळून आल्यास, त्या विकसकाचे (डेव्हलपर्सचे) एसआरए लायसन्सही रद्द करण्यात येणार असल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले़ ......

टॅग्स :PuneपुणेHomeघरfloodपूरRainपाऊस