शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
5
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
6
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
7
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
8
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
9
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
10
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
11
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
12
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
13
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
14
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
16
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
17
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
18
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
19
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
20
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'

संघटित गुन्हेगारांना मदत करणार्‍यांचे धाबे दणाणले ; शहरातील बड्या राजकीय नेत्याची तासभर चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 9:52 PM

शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

पुणे : शहरातील संघटित गुन्हेगारी मोडित काढण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सर्व बड्या गँगस्टारांवर कारवाई सुरु केली आहे.  मोक्का, तडीपारी, स्थानबद्धता अशा विविध मार्गाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. आता या गँगस्टरांना मदत करणार्‍या व त्यांच्यासाठी मध्यस्थ करणार्‍यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. शहरातील एका बड्या राजकीय नेत्याला आज पोलीस आयुक्तालयात बोलविण्यात आले होते. त्यामुळे शहरात त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली. 

गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढून पोलिसांना आव्हान दिले होते. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मारणे याच्यासह सर्वच गँगस्टारांविरुद्ध मोहिम उघडली आहे. गेल्या ५ महिन्यात त्यांनी दीडशेहून अधिक जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. १५ हून अधिक गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. आता त्यांनी या गँगस्टरांना मदत करणार्‍यांकडे आपले लक्ष वळविले आहे. त्यातूनच गजानन मारणे याला मदत करणार्‍या पुण्यातील एक राजकीय नेते आणि व्यावसायिक यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. पोलीस आयुक्तालयात आज दुपारी अनेक आलिशान गाड्या आल्याने सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. या नेत्याला बर्‍याच वेळ बसवून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. या चौकशीतून पोलिसांनी त्यांना योग्य तो इशारा दिल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील संघटित गुन्हेगार टोळ्यांना आश्रय देणारे तसेच त्यांना मदत करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातूनच काही जणांकडे चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त