पुणे : तीन वर्षांपूर्वी नोंदणी केलेल्या घराचा ताबा न मिळालेल्या आणि गुंतवलेले पैसे परत न मिळालेल्या गुंतवणूकदारांनी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिस ठाण्याचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यांच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल करण्यात आली.डी. एस. कुलकर्णी यांनी गुंतवणूक दारांना विविध आकर्षक योजनांचे आमिष दाखविले होते. ठेवींवर १२ टक्के व्याज देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे अनेकांनी लाखो रूपये डीएसके यांच्याकडे गुंतवले. सुरूवातीला काही महिने लोकांना व्याज मिळाले. मात्र, आर्थिक चणचण जाणवू लागल्यानंतर लोकांना पैसे परत करणे डीएसके यांना अशक्य झाले. ठेवीदार डीएसके यांच्या कार्यालयात चकरा मारू लागले. २०१४ मध्ये डीएसके यांनी ’ड्रीम सिटी’ या प्रकल्पासाठी पुणे-सोलापूर रस्त्यालगत तीनशे एकरची जागा निवडली.
डीएसकेंविरुध्द गुंतवणुकदारांची फिर्याद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 5:10 AM