शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

पुण्यातील ओमिषा चिट फंडचा गुंतवणूकदारांना लाखोंचा गंडा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 4:10 AM

पुणेस्थित संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. 

नाशिक : पुणेस्थित संचालकांनी ओमिषा चिटफंड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कार्यालय थाटून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या नऊ संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.राकेश रमेश खैरनार (२८, रा़ गीता रो-हाउस, भीमाशंकरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार भारती राजेश राजपूत, जुई संतोष परदेशी, मानसिंग शंकर घोरपडे, दत्तात्रेय महादेव टकले, कैलास परब (सर्व संचालक, रा. पुणे) व मतीन शेख (व्यवस्थापक), विशाल मराठे (वसुली अधिकारी), गणेश जामोदे (प्रशासकीय अधिकारी) व सागर शिरसाठ (लेखाधिकारी) यांनी मुंबई नाका परिसरातील वासन आय केअर नजीकच्या माधव पार्क येथे ओमिषा चिटफंड प्रा. लि. ही कंपनी सुरू केली़ फिर्यादी खैरनार यांनी १ जानेवारी २०१४ ते आॅक्टोबर २०१७ अशी दरमहा २५ हजार रुपये रोख व धनादेशाद्वारे कंपनीत गुंतवणूक केली़ कंपनीतील गुंतवणूक साडेतीन लाख रुपयांपर्यंत पोहचल्याने त्यांनी व्याज तसेच गुंतवणुकीची रक्कम परत मिळावी, यासाठी कंपनीकडे संपर्क साधला़ मात्र, प्रारंभी कार्यालयीन कर्मचाºयांकडून मुदतीच्या नावावर टोलवाटोलवी करण्यात आली़त्यानंतर खैरनार यांनी संचालकांशी संपर्क साधून पैसे मिळण्याची मागणी केली असता लवकरच तुमचे पैसे मिळतील, असे आश्वासन देण्यात आले़ त्यानंतर एकेदिवशी संचालकांसह कर्मचारी कार्यालय बंद करून फरार झाले़ त्यानंतर खैरनार यांनी पोलिसांत धाव घेतली़या कंपनीत विविध गुंतवणुकदारांनी गुंतविलेली रक्कम काही कोटींमध्ये असल्याची चर्चा असून फसवूणक झालेल्या तक्रारदारांनी तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे़

टॅग्स :Crimeगुन्हा