लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : साधारणतः पंधरा ते वीस वर्षांपूर्वीपर्यंत पुणे शहरात इराणी हॉटेलांची एक वेगळी अशी क्रेझ होती. विद्यार्थी आणि विविध विचारसरणीच्या विचारवंतांचा गप्पांचा हा अड्डा आता पुर्णपणे बदललेल्या स्वरूपात ʻइराणी कॅफेʼ पुणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहेत.
शहरात कॅफे सनराईज, कॅफे नाज, कॅफे गुडलक अशा वेगवेगळ्या इराणी हॉटेल्समध्ये महाविद्यालीन विद्यार्थी आणि विचारवंतांचा अड्डा असायचा! रात्री उशिरापर्यंत, या हॉटेलमध्ये चहा, बनपाव, समोसे आदी पदार्थांसह ही मंडळी तासनतास गप्पागोष्टीत रमायची! भर चौकात दिसणाऱ्या या कॅफेंची ठिकाणं बदलली असून रुपडंही पालटलं आहे! प्रभात रस्ता, बाणेर, कल्याणीनगर, विमाननगर, खराडी, मगरपट्टा, एनआयबीएम रोड येथे या शाखा आहेत.
इराणी कॅफे प्रभात रोडसह, विमाननगर, कल्याणीनगर, वेगवेगळ्या बदलांसह पुणेकरांच्या सेवेत रुजू झाले आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुंबईत ‘इराणी कँफे’ समूहाने ग्राहकांना सेवा देण्यास सुरुवात केली होती ती आज तिच्या शंभराव्या वर्षाकडे यशस्वीरीत्या वाटचाल करत आहे.
आज इराणी कँफेचा मुंबईसह पुण्यात मोठा विस्तार झालेला आहे, जी पिढी इराणी कँफेची सुरुवातीची ग्राहक होती ती अजूनही आपला निवांत वेळ काढून इराणी कँफेतील प्रसिद्ध पदार्थ खाण्यासाठी येत असते. गेल्या तीन चार पिढ्यांना अविरतपणे सेवा देणाऱ्या इराणी कॅफेचं हे मोठं यश आहे!
पुण्यातील इराणी कँफे हे आता असे ठिकाण झाले आहे की तेथे तुम्ही सहकुटुंब जेवण, नाश्त्यासाठी जाऊ शकता. .
कितीही गरीब अथवा श्रीमंत व्यक्ती असेल त्याच्या खिशाला परवडेल अशा मोजक्या किंमतीत चांगली सेवा देण्याचं कसब इराणी कँफेने कायापालटानंतरही जोपासलं आहे. मेनुमध्ये चांगली पोषकद्रव्ये आणि प्रथिने मिळतील याची विशेष खबरदारी येथे घेतली जाते. त्यामध्ये चिज ऑम्लेट, पनीर भूर्जी, बन मस्का आणि चिली चिज ग्रिल सँडविच अशा शाकाहारी पदार्थांचाही समावेश आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सर्व गटातील लोक इराणी कँफेत गेल्या दहा दशकांपासून येत आहेत, हीच नव्याने रूजू झालेल्या इराणी कँफेची मोठी संपत्ती असल्याचे इराणी कँफेच्या संचालकांना वाटते.
..............,..........................
चौकट
चविष्ट आणि दर्जेदार खाद्यपदार्थांमुळे प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांनीही नव्या-जुन्या इराणी कँफेत येऊन पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. यात अभिनेता सुनिल शेट्टी, दिग्दर्शक अमोल पालेकर, अतुल कुलकर्णी आणि क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी आदींचा समावेश आहे.
........
बातमीत एक फोटो तन्मय देणार आहे. याशिवाय, छोटी जाहिरात असेल