--
जुन्नर : छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या वतीने देवराई साकारण्यात येणाऱ्या देवराई प्रकल्पासाठी जैन उद्योग समूहाने सामाजिक दायित्वातून पहिल्या टप्प्यात सुमारे २१ लाखांचा निधी ठिबक सिंचन जलसिंचन सुविधा साहित्य दिले आहे. जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्था यांच्या पाठपुराव्यातून हा निधी उपलब्ध झाला आहे.
वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी सांगितले. याबाबत गौडा म्हणाले, ''शिवनेरी किल्ल्यावर पूर्वापार वनसंपदा आहे. किल्ल्याच्या संवर्धन आणि विकास प्रकल्पांतर्गत किल्ल्यावरील जैवविविधता संवर्धनासाठी वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. मात्र, उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवते. यावर मात करण्यासाठी जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने जैन उद्योग समूहाला शिवनेरी किल्ल्यासाठी ठिबक सिंचन यंत्रणा देण्यासंदर्भात मागणी केली होती. त्याला होकार देत ही संकल्पना मूर्त स्वरुपात आली.
उपक्रम राबविण्याआधी तांत्रिक अधिकारी, पुरातत्त्व विभागाचे संरक्षक सहायक बी. बी. जंगले, वन परिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे आणि सह्याद्रीचे पदाधिकारी यांनी किल्ल्याची संयुक्त पाहणी केली आणि प्रस्ताव सादर केला होता. या देवराई उपक्रमात अंबरखाना इमारतीच्या मागील वनक्षेत्रावर सुमारे २५ एकर क्षेत्रावर देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. यासाठीच्या जलसिंचनाची सुविधा जैन उद्योग समूहाच्या वतीने केली जाणार आहे.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी जैन ठिबकच्या वतीने २१ लाखांची अत्याधुनिक सामग्री सामाजिक दायित्वातून बसविण्यात येणार आहे.
चौकटीसाठी मजकुर.
जैन थिबकचे प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र गाडीवान म्हणाले, “सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या विनंतीला अजित जैन यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, मला शिवनेरीच्या सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार माझ्यासह सह्याद्रीचे सदस्य, वन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह गडावरील पाण्याच्या टाक्या, उपलब्ध पाण्याचा साठा, त्याचा कालावधी याची पाहणी करत, ठिबक सिंचनाचा आराखडा आमच्या कार्यालयासह वन विभागाला सादर केला. त्याला कंपनीने मान्यता दिली.”
--
वनराईत फुलणार १२५ देशी फळझाडे
शिवनेरीवरील जैवविविधता संवर्धनासाठी देशी फळझाडांची लागवड आणि संवर्धन करण्यात येणार आहे. गडावरील जैवविविधता संवर्धनासाठी तसेच पक्षी यांच्या निवाऱ्यासठी फळे असणाऱ्या झाडांची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये गावरान बोरे, चिंच, आंबा, करवंद, फणस, जांभूळ आदी विविध प्रकारच्या सुमारे १२५ देशी फळ-फुलांची झाडे असणार आहेत.
--
फोटो क्रमांक छ
फोटो ओळ शिवनेरीवर देवराई प्रकल्पासठी पाहणी करताना जैन उद्योग समूहाचे तंत्रज्ञ व शासकीय आधीकारी.