शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Nitin Gadkari: नितीन गडकरींना भाजपात डावललं जातयं का? चंद्रकांत पाटलांचं एका वाक्यात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:51 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातून ब्राह्मण समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व दिलं जावं, अशी मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे

मुंबई - भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. तर, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आल्याने भाजपमध्ये नितीन गडकरींना केंद्रीय पातळीवर डावललं जातंय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तर, विरोधी पक्षाकडून तोच सूर आवळला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, या प्रश्नावरील उत्तर पाटील यांनी स्पष्टपणे टाळले.    

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये खुल्या प्रवर्गातून ब्राह्मण समाजाला अधिकाधिक प्रतिनिधित्व दिलं जावं, अशी मागणी ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाच्या प्रतिनिधींनी आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुण्यात भेट घेतली. ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांवर या बैठकीत चर्चा झाली. पावसाळी अधिवेशनानंतर यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोबत बैठक आयोजित करू, असा आश्वासन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासंघाला दिला. तसेच, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरही दिली. त्यातच, देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेचं तिकीट द्यावं, या मागणीसंदर्भातही पाटील यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, या देशात प्रत्येकाला मत मांडण्याचा, मागणी करण्याचा अधिकार असल्याचं ते म्हणाले.

या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा, मागणी मांडण्याचा, त्याचा पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे. परंतु, देवेंद्रजी हे जातीपाती, धर्म याच्या वर आलेले कर्तृत्ववान नेते आहेत. त्यामुळे, त्यांचा विचार नेहमीच त्यांच्या कर्तृत्वाच्या आधारे झाला आहे. म्हणूनच मागणी कोणीही करू शकते, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी ब्राह्मण महासंघाच्या पत्रावर आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, नितीन गडकरी यांना केंद्रात डावललं जातंय का, असा प्रश्न विचारला असता, मला यावर काहीही टिपण्णी करायची नाही, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले. 

ब्राह्मण महासंघाच्या मागण्या

1) 2019 पासून रखडलेली अमृत योजना त्वरित कार्यान्वित करावी2) अमृत योजनेची सारथी प्रमाणे कंपनी कायद्या खाली नोंदणी करावी ( तसा निर्णय युती सरकार ने घेतला होता, कॅबिनेट मध्ये संमत पण झाला होता )  ठाकरे सरकार ने तिला सोसायटी कायद्या खाली घेण्याचा प्रयत्न केला तो रद्द करावा3) अमृत स्थापन करताना जीं उद्दिष्ट आणि ध्येय होती ती बदलण्याची आम्हाला भिती वाटत आहे तसे होऊ नयेते वेबसाईट वर अपलोड व्हावेत4) अमृत कार्यरत झाल्यानंतर त्वरित निर्णय घेण्यासाठी त्याच्या अध्यक्ष पदी कोणी ज्येष्ठ मंत्रीच असावे आणि ते खुल्या प्रवर्गातील असावेत5) 2019 ला निवडलेल्या सदस्यांची त्वरित मीटिंग घ्यावी  ते सदस्य कोण आहेत, त्यांना कशाच्या आधारावर घेतलं हे लोकांना कळू द्यावेत्यात अशासकीय सदस्यांना सुद्धा स्थान द्यावे6) बालभारती येथील सारथीच्या इमारतीत त्याचे कार्यालय करून त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. मागील ठाकरे सरकारने त्याला नाशिक ला नेण्याचा निर्णय घेतला आहे7) येणाऱ्या निवडणूकीत खुल्या जागातून केवळ खुल्या प्रवर्गातील लोकांनाच संधी मिळाव्यात8) उच्च शिक्षणसाठी केवळ जाती साठी कोणाचीही शिक्षणाची संधी नाकरण्यात येऊ नये, जागा वाढवून हे सहज शक्य आहे9) ऍडमिशन घेत असतानाच कोणत्या कोट्यातून घ्यायचे हे नमूद करणे विद्यार्थ्यांना सक्तीचे करावे.एकाच विद्यार्थ्याने अनेक वर्गातून प्रवेश अर्ज करू नये. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNitin Gadkariनितीन गडकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा