पुणे : पुणे शहराला समान व २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यामध्ये येणारे अडथळे व पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे नियमित करण्याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.पुणे मनपा आणि पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांना आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डिसेंबर २०१७ मध्ये भेट घेतली होती. या बैठकीत २४ तास पाणी पुणेकरांना मिळावे म्हणून या कामात येणारे अडथळेबाबत सूचना केल्या होत्या. पिंपरी-चिंचवड पालिका परिसरातील बांधकामे नियमित करण्याबाबत बैठक घेतली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहे.पुणे शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर, या अंतर्गत करण्यात येत असलेले विविध प्रकल्प कागदावरच राहिले असून, निविदा प्रक्रियेतील घोळ याबाबत ही विविध आयुधांचा माध्यमातून चर्चा करतील. मानवी तस्करी रोखून देहविक्रीच्या जाळ्यात अडकलेल्या पीडितांचे पुनर्वसन, शेतकऱ्यांना व अत्याचार पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिवेशनात सरकारकडे विषय प्राधान्याने मांडणार असल्याचे डॉ़ गोऱ्हे यांनी सांगितले.
पुणे शहराचा समान पाणीपुरवठा प्रश्न अधिवेशनात मांडणार : डॉ. नीलम गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 1:09 PM
पुणे शहराला समान व २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यामध्ये येणारे अडथळे व पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे नियमित करण्याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
ठळक मुद्दे'शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर, या अंतर्गत येत असलेले विविध प्रकल्प कागदावरच'डिसेंबर २०१७ मध्ये घेतली होती पुणे आणि पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्तांची भेट