इंदापूर : शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळत असते. चांगले विचार आणि आचार हे शिक्षकांमुळे मुलांना मिळत असतात. शिक्षकांमुळेच देशाची युवा पुढी घडत असते, असे प्रतिपादन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा यांनी केले.
इंदापूर शहा सांस्कृतिक भवन येथे रविवारी शिक्षक दिनानिमित्त इंदापूर तालुक्यात कोरोनाकाळात उत्कृष्ट काम केलेल्या गुणवंत शिक्षकांना रोटरी क्लब ऑफ इंदापूर यांच्या वतीने नेशन बिल्डर अवाॅर्ड या पुरस्काराने, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या वेळी कार्यक्रमास रोटरी क्लबचे संस्थापक सचिव मुकुंद शहा, रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय शहा, सचिव भीमाशंकर जाधव, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे, तहसीलदार अनिल ठोंबरे, नरेंद्र गांधी, नंदकुमार गुजर, धरमचंद लोढा, संजय दोशी, प्रशांत शिताप, दशरथ भोंग, आझाद पटेल, ज्ञानदेव डोंबाळे, नितीन लोंढे, नितीन शहा, प्रमोद भंडारी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी भाषणे केली. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीमाशंकर जाधव यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत घुले यांनी केले, तर आभार सुनील मोहिते यांनी मानले. या वेळी शिक्षक दिनानिमित्त डॉ. उषा भोईटे, ज्योती क्षीरसागर, पूजा घुले, सविता साळुंके या महिला शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.
०६इंदापूर
इंदापूर रोटरी क्लबच्या वतीने शिक्षकांचा गौरव करण्यात आला.