बारामती : ढगाळ हवामान, अधूनमधून पडणारा पाऊस आणि तापमानात होणारा चढ-उतार यामुळे वातावरणातील इंदापूर आणि बारामती तालुक्यांत विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ताप, डोके व घसादुखीच्या रुग्णांमध्ये सात-आठ दिवसांपासून वाढ झाली आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या आठवड्यात सर्वत्र पाऊस झाला. वातावरणात झालेला बदल, ओलसर व चिखलमय रस्ते यामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. याचा लोकमतने घेतलेला आढावा.डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारकबारामती : शहरातील खासगी रुग्णालयांमध्येदेखील थंडी तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी डेंगीचे रुग्ण सरकारी हॉस्पिटलला कळविणे बंधनकारक असल्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमधील माहिती एकत्रित केली जात आहे. शहरातील देसाई इस्टेट, जवाहरनगर, सुभाष चौक, कसबा परिसरात डासांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे विषाणूजन्य आजाराने त्रस्त रुग्णांची संख्यादेखील अधिक आहे.तपासणीसाठी अवाजवीशुल्क आकारणी...रुग्णांची संख्या वाढत असताना पॅथॉलॉजी लॅबमध्येदेखील रक्त तपासणीसाठी गर्दी असल्याचे दिसते. राज्य शासनाने ६०० रुपये दर निश्चित केला आहे. मात्र, या खासगी लॅबमध्ये १२०० ते १५०० रुपये डेंगीचे निदान करण्यासाठी आकारले जात आहेत. डेंगी, चिकुनगुनिया, गोचिड ताप, हिवताप आदींमुळे बारामती शहर, तालुक्यात खासगी, सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दीच दिसते.वेदनाशामकगोळ्या टाळा...थंडी ताप आल्यानंतर काही रुग्ण वेदनाशामक गोळ्या घेतात. डेंगीचे निदान होण्यास उशीर लागतो. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशमक गोळ्या घेऊ नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाºयांनी केले आहे.प्लेटलेट्सचा तुटवडा...डेंगीसह अन्य आजारांमध्ये रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होते. त्याचबरोबर पेशी कमी होण्याचे प्रमाण वाढते. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्लेटलेट्स भरणे आवश्यक असते. मात्र, सध्या रुग्णांची संख्या अधिक असल्याने प्लेटलेट्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पुण्याहून प्लेटलेट्स मागवावे लागतात. तोपर्यंत विलंब होतो. त्यात रुग्णांचा जीव धोक्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
साथीच्या आजारांचे थैमान, डेंगीचे रुग्ण कळविणे बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 6:36 AM