पुणे: कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतदान करताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामुळे मतदानाच्या गुप्तदानाच्या गोपनियतेचा भंग होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार असे प्रश्न लोकांकडून विचारले जात होते. त्यावर रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मी कोणताही गुन्हा केला नसल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
पाटील म्हणाल्या, मुळात मी फोटो काढलेला नाही. त्यामुळे गोपिनियतेचा भंग होत नाही. मला कसब्यातील मतदारांनी त्यांचा फोटो पाठवला होता. मी अद्याप मतदान केलं नाही. तो फोटो मी कसा पाठवेल. माझा अधिकार आहे कि, मी काय पोस्ट करावं काय फोटो टाकावा. मी कोणताही गुन्हा केला नाही. मला एका मतदाराने सांगितले कि, रविभाऊंनाच ताई मतदान आहे. आणि तो फोटो मला पाठवला. तो फोटो मी माझ्या डीपीला आणि फेसबुकला पोस्ट केला आहे. भाजपने या निवडणुकीत मतदारांना धमकावलं, गंज पेठेतील लोकांना मारहाण केली. या सर्वांवर आधी गुन्हा दाखल करा. मग माझ्यावर करा. मी कायदेशीर उत्तर द्यायला तयार आहे.
पैसे वाटण्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. पुरावे देऊन जर कारवाई होत नसेल तर आम्ही काय करावे. काल काही कारवाई झाली नाही म्हणून धंगेकर उपोषणाला बसले होते. राज्याचे मुख्यमंत्री कायदा करणार असतील. तर या भाजप नेत्यांनी कहर केला आहे. भाजपला कसब्यातील जनता २ तारखेला नक्कीच दाखवेल. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर निवडून येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.