महावितरण मात्र वारंवार शेतकऱ्यांनी बिले भरा तरच रोहित्र देऊ हा एक ठेका लावून धरला आहे. ग्रामपंचायत वाकी बुद्रुक, स्थानिक गाव पुढारी सर्वांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले वारंवार फोन केले, पत्र दिले पण महावितरण मात्र एका भूमिकेवर ठाम आहे.
या सगळ्या आडमुठ्या भूमिकेमुळे मात्र यात शेतकऱ्यांच्या शेतमालाचे व घरगुती कामांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या आधीसुद्धा दोन वेळा याच ठिकाणचे रोहित्र एकाच महिन्यात जळाले असून आज २२ दिवस पूर्ण वस्ती व परिसरातील शेतकरी अंधारात आहे.
महावितरण अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांचे म्हणण्यानुसार शेतकरी शेतीपंपांची बिले भरत नसल्याकारणाने आम्ही रोहित्र देत नाही, असे ठणकावून सांगितले. या रोहित्रावर काही शेतकऱ्यांचे शेतीचे हातपंप व बाकी सर्व घरगुती कनेक्शन आहेत.
यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आम्हाला तत्काळ रोहित्र द्या आम्ही बिले भरू अशी मागणी वारंवार केली. शेतकऱ्यांना बिले भरण्याबद्दल विचारले असता, आजपर्यंत आम्हाला कधीही कसल्या प्रकारची बिले महावितरणने आजपर्यंत दिली नाही, या बिलांचे वाटप वेळेत यापूर्वी केले असते तर आम्हीसुद्धा ही बिले वेळेत भरली असती.
त्याचबरोबर वाकी खुर्द मध्ये नव्याने अनेक वीज कनेक्शन हे अनधिकृत असून त्याची चौकशी झाली नाही व रोहित्रावर या अनधिकृत कनेक्शनचा जास्त लोड होत असल्याने वारंवार हे रोहित्र खराब होत आहे, असेदेखील शेतकऱ्यांनी नमूद केले. आज आम्ही संकटात आहे आणि अशा वेळी आम्हाला वेठीस धरणे चुकीचे आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.
परंतु आम्ही आजही खूप संकटात आहे, आम्हाला तत्काळ रोहित्र मिळावे, अशी मागणी वारंवार संबंधित शेतकरी व ग्रामस्थ करत आहे.