शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

पीडित मुलीवर मुंबईतही लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वानवडी परिसरात राहणाऱ्या एका १४ वर्षांच्या मुलीवर तब्बल १३ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलीवर मुंबईत गेल्यानंतर तिच्यावर ठाण्यातील एका ३० वर्षांच्या तरुणाने तिला घरी घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिली.

पुणे स्टेशन येथे मित्राला भेटायला गेलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीला घरी सोडतो, असे सांगून एका रिक्षाचालकाने रिक्षाने नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले होते. वानवडी पोलिसांकडे तिच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून तिच्या मित्रासह १४ जणांना अटक केली आहे.

वानवडी पोलिसांना तपासादरम्यान मुंबईतही मुलीवर बलात्कार झाल्याची बाब समोर आली. पोलिसांनी आरोपीची माहिती मिळवून त्याला मुंबईतून अटक केली आहे.