शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

जिल्ह्यासाठी पाणी सोडणे अशक्य

By admin | Published: April 26, 2016 1:00 AM

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुण्याला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे;

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुण्याला जुलैपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे; त्यामुळे आता जिल्ह्यातील इतर तालुक्यांसाठी शहराच्या वाट्याचे पाणी सोडणे शक्य नसल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांनी सोमवारी स्पष्ट केले.पालिकेच्या मुख्य सभेत शहराच्या पाणीप्रश्नावर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना जगताप यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘पुण्याच्या धरणांमध्ये दर वर्षी आॅगस्टअखेर २८ टीएमसी इतका पाणीसाठा असायचा. चालू वर्षी तो १४.५ टीएमसी इतकाच होता. सध्या धरणांमध्ये ५.५ टीएमसी पाणीसाठा आहे. शहराला जुलैपर्यंत साडेतीन टीएमसी पाणी लागेल. मात्र, बाष्पीभवन व इतर बाबींचा विचार करून या धरणांमधून इतर कोणालाही शहराच्या वाट्याचे पाणी देणे शक्य नाही. इतरांना पाणी दिल्यास शहराला जुलैपर्यंत पाणी पुरणार नाही.’’बांधकाम व इतर वापरांसाठी पिण्याचे पाणी वापरू नये, जीपीएस टँकरला बसवणे, लिकेज कमी करणे आदी लघुकालीन उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात आहेत. त्याचबरोबर, पर्वती ते लष्कर जलकेंद्रापर्यंत बंद पाईपलाईनचे काम हाती घेतले जाणार आहे, ग्रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, २४ बाय ७ अंतर्गत मीटर योजना राबविणे आदी दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जाणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘‘पुणेकरांनी त्यांच्या वाट्याचे ५० टक्के पाणी वापरले आहे व इतर तालुक्यांना ७५ टक्के दिले आहे. त्यामुळे आता पुणेकरांवर जास्तीची पाणीकपात लादता येणार नाही. दौंड, इंदापूरच्या हक्काचा ०.४२ पाणीसाठा आहे, तो त्यांना देण्यात यावा. मुळशीचे पाणी पुणे व पिंपरी-चिंचवडकरांना मिळावे, यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.’’सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘महापौर तुम्ही पुणेकरांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयाबद्दल तुमचे अभिनंदन. पालकमंत्री तुम्ही पुण्याचेच पालकमंंत्री आहात ना, असे मला तुम्हांला विचारायचे आहे.’’ विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा मान्य केला, तरी ते दौंड, इंदापूरसाठी पाणी मागत आहेत, याचे आश्चर्य वाटते. नगरसेवकांना सातत्याने पाण्यासाठी झगडावे लागत आहे.’’ इंदापूर व दौंडमध्ये ३२ दुष्काळग्रस्त गावे आहेत. त्यांना जिल्हा प्रशासनाने टँकर पुरवावेत. त्यासाठी आम्ही मदत करू. बेबी कॅनॉलमधून सोडलेल्या पाण्याचीही पळवापळवी झाली आहे; त्यामुळे कॅनॉलमधून पाणी सोडले, तर पळवापळवी होणार, हे निश्चित आहे.’’ - प्रशांत जगताप, महापौर