शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

मातृभाषेला दुजाभाव देणे अयोग्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:07 AM

पुणे : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी भाषेसह इतरही भाषांविषयी आदर आहे.सर्वांनीच मातृभाषेचा सन्मान राखला पाहिजे. मातृभाषेला दुजाभाव देणे चूकीचेच ...

पुणे : महाराष्ट्रातील जनतेच्या मनात मराठी भाषेसह इतरही भाषांविषयी आदर आहे.सर्वांनीच मातृभाषेचा सन्मान राखला पाहिजे. मातृभाषेला दुजाभाव देणे चूकीचेच आहे. त्यामुळे विद्यापीठाने मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देवून राजभाषेचा सन्मान करावा, अशी मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद व भाषा सल्लागार समिती सदस्यांनी केली आहे.

भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये परकिय भाषा भवनाची स्थापना केली जाते. कारण भारत हा बहुभाषिक देश असल्यामुळे प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्याला विविध भाषांचा अभ्यास करता आला पाहिजे. विद्यापीठांमध्ये स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेज आणि स्कूल आॅफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लॅग्वेज यांची निर्मिती योग्यच आहे. मात्र,त्यात प्रत्येक राज्यात राजभाषेला नेहमी वरचे स्थान असते. त्यामुळे विद्यापीठाने सुध्दा मराठी भाषेचा सन्मान राखत मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देण्याचा निर्णय घ्यायला हवा,अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे येत्या शुक्रवारी विद्यापीठाला पाठविले जाणार आहे.

---

स्वत: विद्यापीठाने राजभाषेसाठी स्वतंत्र संकुल उभे करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. गुजरातमधील विद्यापीठांमध्ये ज्या प्रमाणे गुजराती भाषेला प्राधान्य दिले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये सुध्दा स्कूल ऑफ इंडियन लॅग्वेजमध्ये मराठी विभागाचा समावेश न करता विद्यापीठाने त्यासाठी स्वतंत्र संकुल निर्माण करावे.

- अनिल गोरे, सदस्य, भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र शासन

---

पुणे विद्यापीठाच्या स्थापनेच्या उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेने काम करण्यासाठी मराठी विभागाला स्वतंत्र संकुलाचा दर्जा देणे गरजेचे आहे. मराठी भाषे इतकेच प्रेम आपण इतर भाषांवर करतो. पण इतर भाषांचा अधिक सन्मान करणे आणि मातृभाषेला दुजाभाव देणे योग्य नाही. विद्यापीठाने स्वतंत्र संकुलाची निर्मिती करून मराठी भाषेला सन्मान द्यावा.त्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे शुक्रवारी विद्यापीठाला पत्र पाठविले जाईल.

- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद