पुणे: देशाच्या पंतप्रधानांनी पुणे दौऱ्यादरम्यान दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले . दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिषेक केला त्यावेळी खास महाराष्ट्रीय संस्कृतीच्या ढोल ताशाच्या निनादात देशाच्या पंतप्रधानांचे स्वागत केलं गेलं . पंतप्रधानांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती आणि गणपती बाप्पा मोरया , जय श्रीराम म्हणून जोरजोरात पुणेकर घोषणा देत मोदींचे स्वागत करत होते .
दगडूशेठ गणपती मंदिरा जवळ पोलीस बंधोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला गेला होता अ . ब चौकातून आत मध्ये तसेच शनिवार वाडा परिसरातून सर्व बाजूंनी पोलिसांनी खाजगी वाहनाना सुरक्षेच्या कारणावरून पूर्ण बंदी घातली होती . लोक आपल्या गाड्या नदीपात्रात लावून पावसामध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी आले होते.
काही पुणेकरांनी लोकमतशी बोलताना सांगितले, मोदींचं पुण्यात स्वागत आहे . परंतु त्यांनी लवकरात लवकर मणिपूर सारख्या विषयावर आपल मौन सोडावं आणि बोलावं त्यावर ठोस भूमिका घ्यावी जेणेकरून भारत एकसंघ राहण्यासाठी मदत होईल. मोदींनी आता महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातुन योग्य पावलं उचलावीत मणिपूर सारख्या घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तीने असे शांत बसणे उचित नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणामुळे दगडूशेठ परिसरातील दुकाने पूर्ण पणे बंद ठेवण्यात आली होती हा परिसर मुख्य बाजारपेठेचा असल्या मुळे व्यापाऱ्यांशी साधलेल्या संवादातून अस जाणवलं की मुख्य पेठा बंद ठेवल्याने आज करोडो रुपयांची होणारी उलाढाल थांबणार असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. वरून पाऊस चालू असताना देखील टपूण्यातील तरुण- तरुणी रस्त्यावर उभा राहून मोदी मोदींच्या घोषणा देत होते . काही तरुणींनी मोदींना पहिल्यांदा प्रत्येक्षात पाहत असल्या मूळ खूप आनंद होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत .
देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यास मदत होईल
मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी पुण्याचा विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लावला आहे . पुण्यात मेट्रो चालू होण्यामागे मोदींच योगदान खूप मोठ आहे. २०२४ ला ही मोदीच देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून देश जगामध्ये पहिल्या क्रमांकावर येण्यास मदत होईल - गणेश देशपांडे