पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, त्यामुळे पुणेकर चिंतेमध्ये हाेते. पण आता वरूणराजाची कृपा झाली असून, सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. पावसाळी वातावरणाचा अनुभव पुणेकर घेत आहेत. हवामान विभागानूसार यंदा चांगल्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पण जून महिन्यापासून आतापर्यंत चांगला पाऊस झालेला नाही. परिणामी पुणेकरांमध्ये चिंता लागून राहिली आहे. धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस झाला नाही. पण आता शुक्रवारपासून (दि.१२) पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज सकाळपासूनच शहरात ठिकठिकाणी पावसाची हजेरी पहायला मिळत आहे. दरम्यान, पुण्यात येत्या १४ जुलैपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज देण्यात आला आहे.
पुण्यातील आजचा पाऊस
लवासा : ५१.५ मिमीलोणावळा : ३५.५ मिमी माळिण : ११ मिमी तळेगाव : ९.५ मिमी पाषाण : ७.३ मिमीराजगुरूनगर : ७ मिमी शिवाजीनगर : ५.७ मिमीखेड : ५.५ मिमीवडगावशेरी : ५.५ मिमी एनडीए : ५ मिमीदापोडी : ३ मिमीचिंचवड : १.५ मिमीढमढेरे : १.५ मिमीहडपसर : १ मिमीबालेवाडी : १ मिमी कोरेगाव पार्क : ०.५ मिमी