राज्यपाल तर 'महामहिम' त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नव्हे; अजित पवारांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 02:41 PM2021-09-17T14:41:41+5:302021-09-17T14:42:02+5:30

एका कार्यक्रमात फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला त्यावर दिली प्रतिक्रिया

It is not appropriate for the Governor to speak about him; Indicative statement of Ajit Pawar | राज्यपाल तर 'महामहिम' त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नव्हे; अजित पवारांचं सूचक वक्तव्य

राज्यपाल तर 'महामहिम' त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नव्हे; अजित पवारांचं सूचक वक्तव्य

Next
ठळक मुद्देराऊत आणि पाटलांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नाही

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सेवा आणि समर्पण अभियानाचे आयोजन करमुक्त आले आहे. त्याच निमित्ताने  कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. सायकल रॅलीच्या कार्यक्रमाप्रसंगी एका महिला सायकल पटूचा राज्यपाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी फोटो काढत असताना, राज्यपालांनी त्या महिलेच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला. यावर अजित पवारांनी सूचक वक्तव्य केलं आहे. पुण्यात कोरोना आढावा बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.  

''राज्यपाल महामहिम आहेत. मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित नसल्याचं अजितदादा म्हणाले आहेत.ते आम्हाला शपथ देतात, तो त्यांचा अधिकार असतो. त्यांच्या अधिकारावर बोलण योग्य नाही. म्हणून अजित पवारांनी त्यांच्याविषयी बोलणं टाळलं आहे.''

 केंद्र आणि राज्य सरकारने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना. थेट राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली घेतल्याने, यामुळे एकच चर्चा रंगली आहे.
  
राऊत आणि पाटलांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नाही  

''सध्या कोरोनाची परिस्थिती हाताळण्याबरोबर, आरक्षण, निवडणुका, अशी अनेक कामं माझ्यासमोर आहेत. पाटील, राऊत कोण काय बोललं हरे मला खरंच माहित नाही. सध्या मी खूप कामात गुंतलो असल्यानं त्यांच्या बोलण्याकडं माझं लक्ष नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.''

पुण्यात खेळाडूंसाठी स्वामिंग टॅंक ओपन 

''पुण्यात खेळाडूंसाठी स्विमिंग टॅंक ओपन करण्याची परवानगी दिली आहे. फक्त लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या खेळाडूंनी टॅंक मध्ये जाण्याची परवानगी असणार आहे. अशी अट त्यांनी यावेळी घातली आहे.'' 
सिंहगड परिसर विकास आराखडा तयार; खालून - वर जाण्यासाठी ई वेहिकल सुरू करणार 

''सिंहगड परिसराचा विकास आराखडा तयार असून  ग्राउंड फ्लोअरची पोलीस चौकी, किल्ल्याला शोभेल असं दगडी काम आणि त्या बांधकामाची चौकी उभारण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 35 - 45 ई बस तयार आहेत. सिंहगडावर अनेक पर्यटक जात असतात. त्यामुळं प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गाड्यांसाठी 10 एकर जमिनीवर पार्किंग करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.''

प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू

''पीएमपीएमएलच्या प्रायोगिक तत्वावर ई वेहिकल सुरू करणार आहे. पायथ्यापासून वर जाण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. त्यासाठी तिकीटही आकारले जाणार असून स्थानिक युवकांना रोजगार सुरू व्हावा हा त्यामागचा उद्देश असणार आहे. स्थानिक युवकांना गाईड प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचंही ये म्हणाले आहेत.''

सिंहगड परिसरात टपऱ्यांना बंदी  

''अकरा महिन्याच्या करारवर चांगली दुकानं काढणार. तिथल्या स्थानिक लोकांना जागा देणार. कोणीही येऊन टपरी उभी करू शकणार नाही.  सुटसुटीत दुकानं उभी करणार असून वरच्या बाजूला पर्यटनात शिस्त आणणार असलायचं यावेळी सांगितलं आहे.''

Web Title: It is not appropriate for the Governor to speak about him; Indicative statement of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.