पुणे : जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाला दहा वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप त्या खटल्याची सुनावणी सुरू आहे. या खटल्यादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याने त्याला वेगळे वळण मिळाले आहे. प्रकरणातील मुख्य आरोपी इंडियन मुजाहिद्दीनचा संस्थापक यासीन भटकळ ऊर्फ शिवानंद (रा. भटकळ, जि. उत्तर कनडा, कर्नाटक) याला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे (व्हीसी) येथील न्यायालयात हजर करून खटल्याच्या सुनावणीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे याच प्रकरणातील चार आरोपी फरार असल्याचेही न्यायालयाने घोषित केले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुनावणीसाठी प्रत्येक वेळी हजर करणे अवघड आहे. त्यामुळे भटकळला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करण्यात यावे, असा अर्ज दिल्ली येथील तपास अधिकाºयाने केला होता. यावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळ याला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील यांनी न्यायालयास सांगितले होते. १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी जर्मन बेकरी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात १७ व्यक्ती मृत्युमुखी, तर एकूण ५६ लोक गंभीर जखमी झाले होते. मृत्यू झालेल्यांमध्ये ५ आणि जखमींमध्ये १० परदेशी नागरिकांचा समावेश होता. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास एटीएसकडे सोपविला होता. बेकरीत भटकळ यानेच बॉम्ब ठेवल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला सुनावणीसाठी प्रत्येक वेळी हजर करणे अवघड आहे. त्यामुळे भटकळला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर करावे, असा अर्ज दिल्ली येथील तपास अधिकाऱ्याने केला होता. यावर व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारेच भटकळ याला न्यायालयात हजर करणे योग्य असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी न्यायालयास सांगितले होते. तर, या सुनावणीसाठी भटकळ याला प्रत्यक्ष हजर करण्याची मागणी बचाव पक्षाचे वकील अॅड. जहीरखान पठाण यांनी केली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव आरोपीला हजर करणे होतेय अवघड; जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:08 PM
दुसरीकडे याच प्रकरणातील चार आरोपी फरार असल्याचेही न्यायालयाने केले घोषित
ठळक मुद्दे मुख्य आरोपी यासीन भटकळची व्हीसीद्वारे सुनावणी