शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

'उपसरपंचपदी' निवड झालेल्या महिलेचा सत्कार करणे पडले महागात; शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 9:51 PM

सोशल मीडियावर सत्काराचा फोटो पोस्ट केल्यावर पोलिसांची कारवाई

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक पार पडल्यानंतर ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरांमध्ये पस्तीस ते चाळीसहून अधिक लोकांनी एकत्र येऊन नवनिर्वाचित उपसरपंच महिला रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या चालू पाच वर्षांच्या काळामध्ये अनेकांना सरपंच, उपसरपंच पदाची संधी देण्यात आली. सोमवारी(दि.१७) शिक्रापूर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. यावेळी सत्ताधारी गटाच्या रोहिणी दत्तात्रय गिलबिले यांची उपसरपंचपदी निवड झाली. निवड झाल्यानंतर अनेकांनी ग्रामपंचायत येथे गिलबिले यांचा सन्मान केला.त्यानंतर शिक्रापूर गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील अनेक पदाधिकारी, राजकीय नेते यांसह अनेकांनी तेथे गर्दी केली. शासनाचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमावबंदी असताना देखील लोकांची गर्दी करून नवनिर्वाचित उपसरपंच रोहिणी गिलबिले यांचा सत्कार केला.याबाबतचे फोटो सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस नाईक तेजस लक्ष्मण रासकर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. या फिर्यादीनुसार , रेखा बांदल, शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता राऊत, उपसरपंच रोहिणी गिलबिले, रामभाऊ सासवडे,रेखा बांदल,जयश्री भुजबळ, जयश्री दोरगे, भगवान वाबळे, दत्तात्रय गिलबिले, राजाभाऊ मांढरे, दत्तात्रय राऊत, जनार्दन दोरगे, दिलीप वाबळे, अण्णा हजारे, नाना गिलबिले, आकाश गिलबिल व इतर जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करत आहे.

टॅग्स :Shikrapurशिक्रापूरgram panchayatग्राम पंचायतWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीsarpanchसरपंचElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या