ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 05:39 AM2023-12-26T05:39:46+5:302023-12-26T05:40:57+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

it was not my rebellion a decision made by sitting together ncp sharad pawar replies to ajit pawar | ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

ते माझे बंड नव्हते, एकत्र बसून केलेला निर्णय; शरद पवारांचे अजितदादांना प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे ( Marathi News ): आम्ही केले ते बंड नव्हते, आम्ही एकत्र बसून निर्णय घेतला होता. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेला धरून घेतलेला तो निर्णय होता. त्याबद्दल कोणी तक्रार करण्याची गरज नाही. आज कोणी काही केले असेल, तर त्याबद्दलही तक्रार नाही. मात्र, पक्षाची निर्मिती कशी झाली? संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहिती आहे, त्यामुळे त्यावर भाष्य तरी कशाला करायचे? असा प्रश्न करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

अजित पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता, आता माझंच ऐका कुणाचं ऐकू नका. त्यांचं बरीच वर्षे ऐकलं. मी तरी वयाच्या साठाव्या वर्षी वेगळा निर्णय घेतला, त्यांनी तर वयाच्या ३८व्या वर्षीच तसा निर्णय घेतला होता, असे म्हटले. शरद पवार यांनी सोमवारी भीमथडी जत्रेत अजित पवार यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले. 

...हा ज्याचा त्याचा प्रश्न 

पवार म्हणाले, अनेक वर्षे मी बारामती व त्या भागात साखर कारखाना आणि अन्य संस्थांच्या पदावर कुणी जावे आणि कुणी जबाबादारी घ्यावी, यात लक्ष घातले नाही. कुणी कुणाचे ऐकावे. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पक्ष म्हणून मी नव्या लोकांना संधी देण्याची काळजी घेतली. यात मला आनंद आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: it was not my rebellion a decision made by sitting together ncp sharad pawar replies to ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.