वडगाव मावळ (पुणे) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आधी आमदार रोहित पवार यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते अजित पवार यांची जागा घेऊ पाहत आहेत, असा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी पत्रकारांसोबत बोलताना शुक्रवारी केला.
आमदार शेळके म्हणाले, ‘२० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे २२ जून २०२२ रोजी रोहित पवार पक्षातील मंत्री आणि नवीन आमदारांना घेऊन अजितदादांकडे गेले होते. मात्र, त्यांनी शरद पवारांची परवानगी आणायला सांगताच रोहित पवार आम्हाला साहेबांकडेही घेऊन गेले. त्यामुळे रोहित पवारांनी आमचा स्वार्थ काढू नये.’
आता आम्ही सत्तेत गेल्यावर ते शरद पवारांच्या अधिक जवळ जाऊ पाहताहेत. पण पवार साहेबांच्या जवळचे दादा हे फक्त अजितदादाचं असू शकतात. अन्य कोणत्याही दादांना ते जमणार नाही, असं म्हणत रोहित पवार हे अजित पवार यांची जागा घेऊ शकत नाहीत, असे सांगितले.