पुणे : ज्याच्या विरोधात लढलो त्याचा प्रचार करण्याची वेळ आगामी लोकसभा निवडणुकीत माझ्यावर आली आहे.अशावेळी नगरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणे माझ्या किती जीवावर येत असेल अशा शब्दांत महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आपल्या मनातली खदखद व्यक्त केली.पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेकाप आणि इतर पक्षांनी एकत्र येऊन संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर काँग्रेस राष्ट्रीय युवक अध्यक्ष केशवचंद्र यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, शेकापच्या चित्रलेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत जगताप यांच्याकडून तांबे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. दरम्यान , यांनी नगरमध्ये काम करणेही थांबवले आहे. या बैठकीत त्यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यांवरुन 2014साली झालेला पराभव अजूनही त्यांच्या किती जिव्हारी लागला असल्याचे दिसून आले. तांबे म्हणाले , ज्यांच्या विरोधात मी विधानसभा लढलो आता त्यांचा प्रचार करणं माझ्या जीवावर आले असले तरीही आम्ही आघाडीचा धर्म पाळणार आहोत. आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार आहोत.दक्षिण नगर लोकसभेची लढत ही महाराष्ट्रातल्या सर्वांत प्रतिष्ठेची लढत मानली जात आहे. यात राष्ट्रवादीच्या जगताप यांच्यासमोर काँग्रेस ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाजपमध्ये गेलेले चिरंजीव डॉ सुजय विखे पाटील यांचे आव्हान आहे.अशावेळी तांबे यांचे हे वक्तव्य आश्चर्यकारक मानले जात आहे.
ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 13:05 IST
सत्यजित तांबे यांनी २०१४ साली संग्राम जगताप यांच्या विरोधात अहमदनगरमध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती.
ज्याच्या विरोधात लढलो त्याचाच प्रचार करण्याची वेळ : सत्यजित तांबे
ठळक मुद्देतरी आघाडीचा धर्म पाळणार आणि काहीही करून जगताप यांनी निवडून आणणार