शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
3
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
4
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
5
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
6
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
7
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
8
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
9
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
10
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
11
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
12
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
13
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
14
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
15
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
16
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
17
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
18
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
19
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
20
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."

तो’ बॉम्ब कवलापुरातच निकामी करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 12:14 AM

लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा : चोवीस तास शस्त्रधारी पहारा

सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे सापडलेला लष्करातील बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण यासाठी लष्कराच्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. बॉम्ब सापडून आठवड्याचा कालावधी होऊन गेला, तरी अजूनही लष्कराचे अधिकारी सांगलीत आलेले नाहीत. त्यामुळे बॉम्बच्याठिकाणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा २४ तास शस्त्रधारी पहारा ठेवला आहे. कवलापुरातील बिसूर रस्त्यावरील सुकुमार आष्टेकर यांचे हे शेत आहे. गेल्या आठवड्यात या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरु होते. त्यावेळी ट्रॅक्टरच्या फाळाला एक बॉम्ब आढळून आला होता. त्यानंतर बॉम्बशोधक पथकास पाचारण केले होते. पथकाने तपासणी केल्यानंतर हा लष्करातील असल्याचे स्पष्ट झाले होते. चाळीस वर्षांपूर्वीचा हा बॉम्ब असावा, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. लष्कराच्या मदतीने हा बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा बॉम्ब उचलून निर्जन ठिकाणी नेण्याचे धोक्याचे होते. त्यामुळे आष्टेकर यांच्या शेतातच चार फूट खड्डा खोदून एका पोत्यात हा बॉम्ब ठेवण्यात आला आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांच्या आदेशाने याची माहिती पुण्यातील लष्कराच्या कार्यालयात दिली होती. पण लष्कराचे अधिकारी अजूनही सांगलीत आलेले नाहीत. आष्टेकर यांच्या शेतात बॉम्ब कसा आला? याचाही उलगडा अद्याप झालेला नाही. काही वर्षापूर्वी आष्टेकर यांनी त्यांच्या विहिरीतील गाळ काढला होता. या विहिरीतच हा बॉम्ब असण्याची शक्यता आहे. गाळाबरोबर तो बाहेर आला असावा, असा अंदाज आहे. पण यासंदर्भात कोणतीही ठोस माहिती पुढे आलेली नाही. हा बॉम्ब कवलापुरातच निकामी केला जाणार आहे. पण तो कसा निकामी केला जाणार आहे, हे सांगण्यात आले नाही. (प्रतिनिधी)पोलीस अडकलेलष्कराच्या अधिकाऱ्यांना येण्यास विलंब लागत असल्याने दोन पोलीस याठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना २४ तास पहारा द्यावा लागत आहे. भर उन्हात त्यांना बसावे लागत आहे. त्यांना हे ठिकाण सोडून कुठे न जाण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच या परिसरात नागरिकांना तेथे येण्यास मनाई करण्यात आली आहे. भीतीने शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात जायचेही बंद केले आहे.