अजित पवारांना भाजप सरकारने क्लीनचिट दिली म्हणणे चुकीचे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 01:52 PM2019-12-25T13:52:28+5:302019-12-25T14:16:49+5:30
तीन दिवसांसाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना क्लीनचिट देण्यात आली असे म्हणणे चुकीचे आहे. ते काम प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे करण्यात आले' असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात लगावला.
पुणे : तीन दिवसांसाठी भाजपचे सरकार स्थापन झाल्यावर अजित पवार यांच्यावरील गुन्हे मागे घेऊन त्यांना क्लीनचिट देण्यात आली असे म्हणणे चुकीचे आहे. ते काम प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजाप्रमाणे करण्यात आले' असे स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात दिले .कोथरूडमधील विकासकामांच्या उदघाटनांसाठी आल्यावर त्यांनी माध्यमांशी विविध विषयावर संवाद साधला.
पुढे ते म्हणाले की, सध्याच्या सरकारमध्ये शिवसेना मोठ्या भूमिकेत आहे. मागे त्यांनीही भाजपच्या खांद्याला खांदा लावून अजित पवार यांच्यावर टीका केली होती. आता त्यांना अजित पवार दोषी दिसत नाहीत का असा टोलाही त्यांनी लगावला. पवार यांच्यावरील केसेस मागे घेण्यासाठी नवीन सरकारने सूचना दिल्या की अधिकाऱ्यांनी स्वतः केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीत यु टर्न मारला असून ही जनतेची फसवणूक आहे असा आरोपही त्यांनी केला. ते म्हणाले की, 'उद्धव ठाकरे यांचा टर्न आता 'यु' टर्न होणार आहे.
यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे :
- शिवथाळी योजना स्वागत पण यात भ्रष्टाचार झाला तर पाहू.
- पंकजा मुंडे व एकनाथ खडसे यांची नाराजी पक्षाची नाही.ती एखाद्या व्यक्ती ,घटना यांच्याबद्दल आहेत, त्या एकत्र बसून सोडवू .
- मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जातोय हे संबंधित प्रमुखांना विचारण्यात यावे.