पुणे : राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) प्रवेशासाठी येत्या सोमवारपासून आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू होत आहे. विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज भरणे बंधनकारक आहे. प्रवेशाबाबतची सविस्तर माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.संचालनालयाच्या वतीने राज्यातील सर्व आयटीआयमधील विविध व्यवसाय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने केंद्रीय प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेतून प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना दि. २७ जूनपासून आॅनलाइन प्रवेश अर्ज भरता येईल. तसेच अर्जात दुरुस्ती करणे व प्रवेश अर्ज पूर्ण भरल्यानंतर प्रवेश अर्जाची छापील प्रत घेण्यासाठी दि. १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. राज्यातील सर्व ‘आयटीआय’मध्ये प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्रे असतील. या केंद्रांवर विद्यार्थ्यांना माहितीपुस्तिका उपलब्ध होईल. स्वीकृती केंद्रांवर अर्जाची छापील प्रत व विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची छाननी केली जाईल. त्यानंतर अर्जाचे निश्चितीकरण केले जाईल. दहावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण व चार फेऱ्यांपर्यंत कुठेही प्रवेश न घेतलेल्या, तसेच प्रवेशासाठी अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाचव्या फेरीपूर्वी नव्याने अर्ज करण्याची किंवा अर्जात बदल करण्याची संधी देण्यात येईल. ही प्रक्रिया दि. १ ते १३ आॅगस्ट या कालावधीत होईल. दि. १४ जुलै रोजी शासकीय आयटीआयमधील रिक्त जागा प्रसिद्ध केल्या जातील. दि. १६ ते १७ आॅगस्ट रोजी या विद्यार्थ्यांचे समुपदेशन फेरीमध्ये प्रवेश होतील. त्यानंतर खासगी संस्थेतील संस्थास्तरावरील प्रवेश होतील. या प्रक्रियेमध्ये सर्व प्रकारच्या जागांसाठी प्रवेश हे केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने होणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत आॅनलाइन प्रवेशप्रणालीव्यतिरिक्त प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. संकेतस्थळ : ँ३३स्र://ंे्रि२२्रङ्मल्ल.५िी३.ॅङ्म५.्रल्ल(प्रतिनिधी)आयटीआय प्रवेशाचे वेळापत्रकदि. २७ जून ते १० जुलै : आॅनलाइन प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे व अर्जाची छापील प्रत घेणेदि. २७ जून ते ११ जुलै : प्रवेश अर्ज निश्चित करणे आणि पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे.दि. १२ जुलै : प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे. हरकती नोंदविणे.दि. १४ जुलै : पहिली निवड यादी प्रसिद्ध करणेदि. १४ ते १८ जुलै : निवड यादीतील विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.दि. २० ते २२ जुलै : दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे. दि. २४ जुलै : दुसरी निवड यादी प्रसिद्ध करणेदि. २४ ते २७ जुलै : निवड यादीतील विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.दि. २९ ते ३१ जुलै : तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे. नव्याने पर्याय न दिल्यास जुनेच पर्याय ग्राह्य धरले जातील.दि. २ आॅगस्ट : तिसरी निवड यादी प्रसिद्ध करणे.दि. २ ते ४ आॅगस्ट : निवड यादीतील विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.दि. ६ ते ८ आॅगस्ट : चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय पर्याय व प्राधान्य सादर करणे.दि. १० आॅगस्ट : चौथी निवड यादी प्रसिद्ध करणे.दि. १० ते १२ आॅगस्ट : निवड यादीतील विद्यार्थ्यांनी मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी उपस्थित राहून प्रवेशाची प्रत्यक्ष कार्यवाही करणे.
आयटीआय प्रवेश सोमवारपासून
By admin | Published: June 25, 2016 12:45 AM