बारामती : इंदापूर तालुक्यातील खोरोची या ३ हजार लोकवस्ती असलेल्या छोट्या खेडेगावातील छोट्याशा किराणा दुकानदाराच्या मुलीने मोठ्या जिद्दीने पायलट बनण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. परिसरात प्रथमच एका वेगळ्या वाटेवर मिळविलेले यश कौतुकाचा विषय ठरले आहे. सतीश सोळंकी यांची मुलगी शिल्पा हिची ही यशोगाथा आहे.
कष्ट आणि जिद्द चिकाटीच्या जोरावर तिचे पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले. सोळंकी यांच्या मुलीने लहानपणापासूनच पायलट होण्याचं व विमान चालवण्याचे स्वप्न बाळगले होते. लहान असताना शिल्पाने कधी बाहुली नाही मागितली, पण खेळण्यातील विमान मात्र ती हट्टाने घेत असे. शिल्पाचे १२ वी पर्यंतचे शिक्षण बारामतीमध्ये पूर्ण झाले आहे. बारामती येथील खासगी पायलट ट्रेनिंग प्रवेश घेतला. या ठिकाणी ३ महिने प्रशिक्षण घेतल्यावर उस्मानाबाद येथे फ्लाइंगसाठी प्रवेश घेतला. या ठिकाणी प्रवेश घेताना रणजित पवार यांनी तिला मदत केली.त्यानंतर शिल्पाने पुणे येथे ३ महिन्याचा ग्राउंड क्लास लावला. या परीक्षेत १०० पैकी ८० गुण मिळवून शिल्पा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. प्रत्येक परीक्षेत तिने ८० च्या पुढेच मार्क मिळवले. दिल्ली येथे आयसीआर या अवघड समजल्या जाणाऱ्या परीक्षादेखील शिल्पाने पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली. पण नंतर पायलटसाठीच्या नोकºया उपलब्ध नसल्याने शिल्पाने २-३ वर्षांचा गॅप घेतला. पण तिला पायलट होण्याचे तिचे स्वप्न गप्प बस देत नव्हते. शिल्पाने परत बारामती येथे पायलट ट्रेनिंग पूर्ण केले. त्यानंतर शिल्पा न्यूझीलंड येथे मल्टिइंजिन हा एका महिन्याचे ट्रेनिंग घ्यायला गेली. तिथे देखील जिद्दीने ९५ टक्के गुणांनी शिल्पा पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाली. न्यूझीलंडवरून भारतात आल्यावर कमर्शियल पायलट परवाना काढला. एवढे सगळे करूनदेखील पायलट क्षेत्रात नोकºया नसल्याने शिल्पाने पुण्यामध्ये स्वत:ची अॅकॅ डमी सुरू केली. ज्यामध्ये जमिनीवर बसून हवेत उडणाºया विमानाची अभ्यास घेतला जात आहे. ट्वीनस्टार ही अशा प्रकारचा अभ्यास घेणारी पुण्यातील एकमेव अॅकॅ डमी आहे. या अॅकॅ डमीमध्ये अतुल अष्टेकर, डॉ. इनामदार, संदीप जगदाने या सारखे वेगवेगळ्याक्षेत्रात नावाजलेले लोक यांनी इथे अॅडमिशन घेतले आहे. इथे विमान तसेच विमानाबद्दलाची पूर्ण माहिती दिली जाते. शिल्पा आता दिल्ली येथे स्पाईस जेटमध्ये को-पाइलेट म्हणून ट्रेनिंग घेत आहे. या ठिकाणी निवड होत असताना जेव्हा शिल्पाचा मुलाखत होती त्या दिवशी नेमका महिला दिवस होता. या मुलाखतीत शिल्पाने पहिला नंबर मिळवला. खºया अर्थाने त्या महिलादिनाला शिल्पाच्या निकालाने महिलांना जिद्दीचा संदेश दिला. शिल्पा ग्रामीण भागातील मुलींची आदर्श बनली आहे.आर्थिक अडचणींवर मात करताना कुटुंबीयांनी मदत केली. आजी, वडील, आई, भाऊ, बहीण हे नेहमी तिच्या पाठीशी उभे राहिले. यामुळे ती आज स्वप्न पूर्ण करू शकली. वेगवेगळ्या शहरात परीक्षांसाठी जाताना दिल्ली, कोलकाता येथे जाताना काय कागदपत्रे असावीत परीक्षेचे स्वरूप काय असते याचे मार्गदर्शन माहिती असणे गरजेचे आहे. बारामतीतील नितीन जाधव या पायलट सहकाºयाने मदत केल्याचे तिने सांगितले.शिल्पाचे वडील सतीश सोळंकी यांनी सांगितले की, शिल्पा लहान होती तेव्हापासून तिची पायलट होण्याची इच्छा होती. शिल्पाची जिद्दबघून घरच्यांनीदेखील तिला पाठिंबा दिला. आर्थिक अडचण असल्यास नातेवाईकांकडून पैसे आणले. पण शिल्पाचे पायलट होण्याचे प्रशिक्षण पूर्ण केले. शिल्पाचा यशाचा प्रवास सांगताना तिच्या कुटुंबीयांचे डोळे पाणावले होते.