लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रकाश विलास जाधव या कोल्हापुर (पो. औरवाड, ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने ३९९.०८ टन ऊस उत्पादन घेत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. त्यांंना वसंतदादा साखर संस्थे (व्हीएसआय)तर्फे यशवंतराव चव्हाण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. जाधव यांनी को-८६०३२ जातीच्या ऊसाचे पूर्वहंगामी उत्पादन घेतले.
वसंतदादा साखर संस्थेची (व्हीएसआय) चव्वेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शनिवारी (दि. ९) पुण्यात होणार आहे. यावेळी हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार, संस्थेचे विश्वस्त आदी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देेशमुख यांनी ही माहिती दिली.
चौकट
सर्वाधिक ऊस उत्पादन घेणारे
शेतकरी उस उत्पादन (टन प्रती हेक्टरी)
१) अण्णासाहेब धनपाल खुरपे, मु. पो. मजरेवाडी ३७१.४३ - पूर्व हंगामी
ता. शिरोळ, जि. कोल्हापुर
२) सुरेश कृष्णा साळुंखे, मु. पो. पारे, ता. खानापूर ३३६.३० - सुरु हंगाम
जि. सांगली
३) अशोक हिंदूराव खोत, मु. पो. इस्लामपूर, ३०८.२५ - खोडवा
ता. वाळवा, जि. सांगली
चौकट
उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार
१) श्री छत्रपती शाहू ससाका, ता. कागल, जि. कोल्हापुर
२) भीमाशंकर ससाका, पारेगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे
३) पूर्णा ससाका, ता. बसमत, जि. हिंगोली
चौकट
उत्कृष्ट कारखाने
१) रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट आसवनी पुरस्कार - श्री अंबालिका शुगर प्रा. लि, ता. कर्जत, जि. नगर
२) किसन वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार - दौंड शुगर प्रा. लि., ता. दौंड, जि. पुणे
३) सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार - क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड ससाका, ता. पळस, जि. सांगली