नयना भानुदास लोखंडे, हनुमंत काळुराम लोखंडे, रामदास दत्तात्रय लोखंडे, शितल बाळासाहेब लोखंडे, संगीता बाळासाहेब लोखंडे, अमोल भगवान लोखंडे, उज्ज्वला संभाजी लोखंडे, सतीश बाजीराव लोखंडे, संतोष भीमाजी कुंभार, स्वाती मयूर चव्हाण, वैशाली मच्छिंद्र लोखंडे, संतोष मुक्ताजी भुसे, आशा सोमनाथ लोखंडे, नयना सुनील वर्पे व भानुदास भगवंत लोखंडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून विजय मिळविला.
चऱ्होली खुर्दला तेरा जागा बिनविरोध
आळंदी : चऱ्होली खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या एकूण पंधरा जागांपैकी सुमारे १३ जागा बिनविरोध निवडून देण्यात ग्रामस्थांना यश मिळाले होते. उर्वरित फक्त दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये प्रभाग चारमधून रामदास पोपट घोलप (नागरिकांचा मागासवर्ग) व प्रभाग पाचमधून शालन पांडुरंग पगडे (नागरिकांचा मागासवर्ग महिला) या विजयी झाल्या आहेत, तर आशा प्रकाश थोरवे, पूजा रामदास थोरवे, पांडुरंग विठ्ठल थोरवे, पूजा काळुराम ठाकर, अनिकेत साहेबराव कुऱ्हाडे, रवींद्र ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुवर्णा राजकुमार बांगर, तुकाराम ज्ञानोबा केवळ, आश्विनी रमेश थोरवे, राहुल चंद्रकांत भोसले, अर्चना धनंजय थोरवे, स्वप्नाली मयूर पगडे, निखिल गोपाळ थोरवे या तेरा जणांची बिनविरोध वर्णी लागली आहे.
रासे येथे भैरवनाथ ग्रामविकास पॅनलचा विजय
शेलपिंपळगाव : रासेयेथे भैरवनाथ महाराज ग्रामविकास पॅनलने ६-५ अशा फरकाने विजय मिळवला. प्रभाग चारमधील किरण दादू ठाकर हे बिनविरोध झाले होते. उर्वरित दहा जागांवर प्रभाग एकमधून श्वेता धनंजय मुंगसे, रमेश साहेबराव मुंगसे, प्रभाग दोनमधून श्वेता अनिकेत केदारी, वैशाली सुरेश मुंगसे, प्रभाग तीनमधून विजय रघुनाथ शिंदे, नीता संतोष केदारी, सविता गणपत मुंगसे, तर प्रभाग चारमधून लक्ष्मण राजाराम शिंदे, शंकर राजाराम थोरात, सुजाता गणेश शिंदे हे निवडून आले आहेत.
- धानोरेत केंद्राईमाता पॅनलचा ८-१ने विजय
आळंदी : धानोरेयेथे केंद्राईमाता पॅनलने ८-१ असा दणदणीत विजय संपादन केल्याची माहिती शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी सांगितले. यामध्ये सुरेखा गावडे या बिनविरोध निवडणूक आल्या होत्या. उर्वरित आठ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत ज्योती गावडे, संतोष गावडे, नवनाथ गायकवाड, अनिल गावडे, सारिका गावडे, संग्राम गावडे, संगीता लोंढे यांनी विजय मिळविला.
केळगाव (ता. खेड) येथे प्रभाग एकमधून हरीश पांडुरंग मुंगसे, रश्मी श्रीधर म्हस्के यांची बिनविरोध निवड झाली होती, तर प्रभाग दोनमधून लताबाई रघुनाथ वीरकर, ज्योती संतोष वहिले, नामदेव नंदकुमार मुंगसे, प्रभाग तीनमधून किरण काळुराम मुंगसे, दत्तात्रय हरिभाऊ मुंगसे, प्रभाग चारमधून अक्षय दादाभाऊ मुंगसे, आश्विनी निखिल गायकवाड, रूपाली शिवाजी मुंगसे हे विजयी झाले आहेत.